तिवस्यात शासक ीय सोयाबीन खरेदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:43 PM2017-10-29T22:43:30+5:302017-10-29T22:43:54+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शासकीय सोयाबीन खरेदीचा शुभारंभ आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.

Continuing the purchase of political soybean in the tehsil | तिवस्यात शासक ीय सोयाबीन खरेदी सुरू

तिवस्यात शासक ीय सोयाबीन खरेदी सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देशुभारंभ : यशोमती ठाकूर यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शासकीय सोयाबीन खरेदीचा शुभारंभ आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम वजन काट्याचे पूजन करून सोयाबीन विक्रीस आणणाºया प्रथम शेतकºयाचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश साबळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप काळबांडे, पं.स सदस्य मंगेश भगोले, लुकेश केने, उज्ज्वला पांडव, रंजना पोजगे, बाजार समितीचे सभापती रामराव तांबेकर, कमलाकर वाघ, खरेदी विक्रीचे अध्यक्ष गजानन अळसपुरे, प्रदीप बोके, दिनेश साव, किशोर चौधरी, गजानन देशमुख, मोहन चर्जन, रणजित राऊत, प्रमोद धावडे, तुळशीराम भोयर, योगेश देशमुख, श्याम देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक प्रदीप बोके यांनी, तर संचालन व आभार प्रदर्शन दिनेश साव यांनी केले. सोयाबीन खरेदीची आॅनलाइन नोंदणी तिवसा येथील खरेदी विक्री, तर कापूस व इतर शेतीविषयक बाबींची आॅनलाइन नोंदणी बाजार समिती तिवसा येथे करावी, असे आवाहन सचिव ज्योती रोंघे यांनी केले आहे.
कापूस खरेदीला सुरुवात
तिवसा जिनिंग प्रेसिंग येथे शनिवारपासून पणन महासंघाचे वतीने कापूस खरेदीचा शुभारंभ पणन महासंघाच्या संचालिका छाया दंडाळे यांचे हस्ते करण्यात आला. पनन महासंघाचे वतीने आॅनलाईन कापूस खरेदी तिवसा येथे सुरू झाली. यावेळी जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष साहेबराव लसनापुरे, माजी सभापती शंतनू देशमुख, बाजार समिती सचिव ज्योती रोंगे, ग्रेडर उंबरकर, नाना माहोरेसह आदी उपस्थित होते.

Web Title: Continuing the purchase of political soybean in the tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.