दोन महिन्यांच्या वेतनावर अडले कंत्राटी कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 09:55 PM2019-02-06T21:55:15+5:302019-02-06T21:55:36+5:30

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील स्वच्छता, कक्ष सेवेतील १२० कर्मचारी दोन महिन्यांचे वेतन एकमुस्त मिळावे यासाठी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे सुपर स्पेशालिटीतील कामकाज बाधित झाल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. तेथे चतुर्थश्रेणी कर्मऱ्यांची नियुक्तीच नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Contract workers stuck on two-month salary | दोन महिन्यांच्या वेतनावर अडले कंत्राटी कर्मचारी

दोन महिन्यांच्या वेतनावर अडले कंत्राटी कर्मचारी

Next
ठळक मुद्देरुग्ण वाऱ्यावर : रुग्णालयात शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचारी नाहीच

अमरावती : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील स्वच्छता, कक्ष सेवेतील १२० कर्मचारी दोन महिन्यांचे वेतन एकमुस्त मिळावे यासाठी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे सुपर स्पेशालिटीतील कामकाज बाधित झाल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. तेथे चतुर्थश्रेणी कर्मऱ्यांची नियुक्तीच नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.
विभागीय संदर्भ सेवा (सुपर स्पेशालिटी) रुग्णालयात सन २००८ पासून कंत्राटदार राजू काळे व विनोद ढोके यांच्या अधिपत्याखाली १२० कंत्राटी कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यांना वेळेत वेतन मिळत नाही. याबाबत बोलल्यास काढून टाकण्याची धमकी दिली जाते. काम करा, वेतनाचे बोलू नका, असा मानसिक त्रास देतात. याची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी आरोग्य खात्याचे प्रधान सचिवांना पत्राद्वारे वारंवार केली. परंतु, दखल घेतली नाही. त्यामुळे बेमुदत संप पुकारल्याचे कंत्राटी कर्मचारी म्हणाले. रुग्णालय प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क केला असता, होऊ शकला नाही.
१२९ रुग्ण भरती, नऊ रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत
सुपर स्पेशालिटीत बुधवारी १२९ रुग्ण विविध आजारांवरील उपचारार्थ भरती आहेत. येथे प्रथमश्रेणी कर्मचाºयांच्या १० जागा असताना एकच कर्मचारी कार्यरत आहे. द्वितीयश्रेणी कर्मचाऱ्यांच्या २६ जागा प्रस्तावित असून केवळ १५ कर्मचारी कार्यरत आहेत. तृतीयश्रेणी कर्मचारी १५ कार्यरत असून, चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांची एकही जागा शासकीय नसल्याने सर्व कामे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर असल्याने ९ रुग्णांची शस्त्रक्रिया प्रतीक्षेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वेतनाची प्रतीक्षाच
कंत्राटी कर्मचाऱ्यांची मस्टरवर स्वाक्षरी घेतली जाते. बेरर धनादेशाद्वारे बँक खात्यात मानधन वितरित केले जाते. वेतनाची प्रक्रियादेखील चुकीची आहे. त्यासाठीदेखील तीन ते चार महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

शासनाकडून योग्य वेळी पैसे प्राप्त न झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. त्यांना डिसेंबरचे वेतन २९ जानेवारी रोजी दिले. मात्र, दोन महिन्यांचे वेतन एकदम मिळावे, या अटीवर ते अडले आहेत.
- तुलसीदास भिलावेकर,
विशेष कार्यकारी अधिकारी

Web Title: Contract workers stuck on two-month salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.