ठेकेदाराने लगावली जिल्हा परिषद कर्मचाऱ्याच्या कानशिलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:10 AM2021-07-10T04:10:30+5:302021-07-10T04:10:30+5:30

अमरावती : एका ठेकेदाराने जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक १ येथील कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून कानशिलात लगावून शासकीय कामात अडथळा ...

The contractor installed the ear stone of the Zilla Parishad employee | ठेकेदाराने लगावली जिल्हा परिषद कर्मचाऱ्याच्या कानशिलात

ठेकेदाराने लगावली जिल्हा परिषद कर्मचाऱ्याच्या कानशिलात

googlenewsNext

अमरावती : एका ठेकेदाराने जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक १ येथील कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून कानशिलात लगावून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना ६ जुलै रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभागात घडली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी ठेकेदारावर गुन्हा नोंदविला.

अनिकेत फाटे(ठेकेदार) (रा. अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी अतिश राजू बोयत (२७, रा. हरिओम कॉलनी साईनगर) यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. त्यावरून आरोपीविरुद्ध गुरुवारी गाडगेनगर पोलिसांनी भादंविची कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ नुसार गुन्हा नोंदविला. फिर्यादी हे सरकारी कर्मचारी असून आरोपी हा उपअभियंता संतोष वैद्य यांच्या केबीनमध्ये डोकावून कान देऊन चर्चा ऐकत होता. त्याला फिर्यादीने हटकले असता, आरोपीला फिर्यादी हे सरकारी कर्मचारी असल्याचे लक्षात असूनही शिवीगाळ करून कानशिलात लगावली. वरून धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Web Title: The contractor installed the ear stone of the Zilla Parishad employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.