मधुमेह नियंत्रित करा; म्युकरमायकोसिस टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:12 AM2021-05-22T04:12:11+5:302021-05-22T04:12:11+5:30

पान ३ अमरावती : म्युकरमायकोसिस टाळण्यासाठी कोरोनापश्चात रुग्णांनी वैयक्तिक स्वच्छता जपणे खूप महत्त्वाचे आहे. वेळोवेळी मास्क बदलणे, टूथब्रश बदलणे, ...

Control diabetes; Avoid mucormycosis | मधुमेह नियंत्रित करा; म्युकरमायकोसिस टाळा

मधुमेह नियंत्रित करा; म्युकरमायकोसिस टाळा

Next

पान ३

अमरावती : म्युकरमायकोसिस टाळण्यासाठी कोरोनापश्चात रुग्णांनी वैयक्तिक स्वच्छता जपणे खूप महत्त्वाचे आहे. वेळोवेळी मास्क बदलणे, टूथब्रश बदलणे, दिवसातून दोनदा ब्रश करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले.

कोरोनापश्चात रुग्णांमध्ये मधुमेह नियंत्रित नसणे, प्रतिकारशक्ती क्षीण होणे आदी कारणांमुळे म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. काळी बुरशी आजाराविषयी नागरिकांमध्ये जाणीवजागृती होणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणा, वैद्यक क्षेत्रासह विविध यंत्रणा, संस्था, संघटनांनी समन्वयाने प्रभावी जनजागृती करावी. प्राथमिक स्तरावर उपचार व काळजी घेतल्यास या आजाराची जोखीम कमी होऊ शकते. कोरोनाबाधितांवर उपचार करताना स्टेरॉईडचा अनावश्यक वापर होता कामा नये, असेदेखील तज्ज्ञांनी सांगितले.

नेमका काय आहे ‘म्युकरमायकोसीस’?

म्युकरमायकोसिस नावाच्या बुरशीमुळे हा संसर्ग होतो. ती पर्यावरणात नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असते. मात्र, जेव्हा मानवी शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा म्युकरमायकोसिसची लागण होते. या बुरशीचा कण श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर फुफ्फुस आणि सायनसवर दुष्परिणाम होतात. योग्य वेळी निदान व बुरशीप्रतिबंधक उपचार केल्यास रुग्ण बरा होतो. प्रतिकारशक्ती कमी असलेली व्यक्ती, इतर दीर्घकालीन आजार मुख्यतः मधुमेह औषधोपचार (स्टेरोईड्सचा गरजेपेक्षा अधिक वापर) कर्करोग पीडित रुग्ण यांना या आजाराची लागण होताना दिसून येते.

लक्षणे

डोके दुखणे, चेहऱ्याला सूज येणे, ताप येणे, तोंड गळून येणे व त्यामधून पू येणे, दातातून पू येणे, दात हलणे, जबड्याचे हाड उघडे पडणे, हिरड्यांना सूज येणे व त्यातून रक्त येणे, सायनसमध्ये रक्तसंचय आढळणे, डोळ्यांना सूज येणे व हालचाल कमी होणे, चेहऱ्याची त्वचा काळी पडणे, अस्पष्ट दिसणे, नाकात काळे सुके मळ तयार होणे, दात काढल्यानंतर न भरणारी जखम आदी लक्षणे आढळल्यास दंत अथवा मुख आरोग्य तज्ज्ञांकडून त्वरित सल्ला घेणे आवश्यक आहे.

काय करावे?

● रक्तातील साखर नियंत्रित ठेवावी

● मधुमेही रुग्णांनी आणि कोरोनातून बरे झालेल्यांनी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासावे

● लक्षण दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधावा

● स्टेरॉईडचा वापर सांभाळून करावा

● टूथब्रश, मास्क वरचेवर बदलावे

● दिवसातून एकदा गुळण्या करणे

● जमिनीखाली लागणाऱ्या भाज्या नीट स्वच्छ धुवून खाव्यात

● ऑक्सिजन उपचारावेळी ह्युमिडीफायरमध्ये स्टराईल वॉटर वापरावे

Web Title: Control diabetes; Avoid mucormycosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.