मोबाईलद्वारे मोटरसायकल, वीज बिघाड अन् उपकरणांवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:23 PM2018-12-26T22:23:09+5:302018-12-26T22:23:40+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बुधवारी आविष्कार स्पर्धेला थाटात प्रारंभ झाला. यात पाचही जिल्ह्यांतील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आपली कल्पनाशक्ती आणि ज्ञानाच्या बळावर नवसंशोधनात आघाडी घेतली आहे. मोटरसायकलची चोरी रोखणे, वीज वितरण व्यवस्थेत बिघाड शोधणे, घरातील विद्युत उपकरणे गुगलवरून नियंत्रण अशा एक ना अनेक प्रतिभा मॉडेल आणि पेपर स्वरुपात मांडल्या आहेत.

Control of motorcycles, power failure and equipment through mobile | मोबाईलद्वारे मोटरसायकल, वीज बिघाड अन् उपकरणांवर नियंत्रण

मोबाईलद्वारे मोटरसायकल, वीज बिघाड अन् उपकरणांवर नियंत्रण

Next
ठळक मुद्देविद्यापीठात नवसंशोधकांची यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बुधवारी आविष्कार स्पर्धेला थाटात प्रारंभ झाला. यात पाचही जिल्ह्यांतील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आपली कल्पनाशक्ती आणि ज्ञानाच्या बळावर नवसंशोधनात आघाडी घेतली आहे. मोटरसायकलची चोरी रोखणे, वीज वितरण व्यवस्थेत बिघाड शोधणे, घरातील विद्युत उपकरणे गुगलवरून नियंत्रण अशा एक ना अनेक प्रतिभा मॉडेल आणि पेपर स्वरुपात मांडल्या आहेत.
विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण भवन सभागृहात आविष्कार स्पर्धेचे उद्घाटन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली तर, प्रमुख अतिथी म्हणून दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य जी. गोपाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख, आय.आय.एल.चे संचालक डी.टी. इंगोले, रसायनशास्त्र विभागप्रमुख आनंद अस्वार, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख आदी उपस्थित होते. आविष्कार स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आटोपल्यानंतर पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेले मॉडेल, पेपरची पाहणी केली. कुलगुरू चांदेकर, अनुदान आयोगाचे सदस्य जी. गोपाल यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे कौतुक केले. काही मॉडेल्सचे निरीक्षण करताना ते समाजपयोगी कसे ठरतील, याची माहितीदेखील कुलगुरूंनी घेतली. अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती व प्रतिभा बघण्यासाठी आविष्कार स्पर्धेला जणू यात्रेचे स्वरूप आले होते.
हे मॉडेल ठरले लक्षवेधक
आविष्कार स्पर्धेत शिवकालीन जलव्यवस्थापन, रात्रीचे अपघात टाळण्यासाठी प्राण्यांच्या शिंगांना रेडीयम, टाकाऊ कागदाचा वापर करून पर्यावरणपूरक मूर्त्यांची निर्मिती, पर्यावरणासाठी पोषक अ‍ॅक्वॉपाईड, इंधनाशिवाय चालणारे वाहन, सोलर वॉटर हिटर, पॅराबोलिक सोलर कुकर, गुगल असिस्टंटवर घरगुती विद्युत वापराच्या यंत्रावर नियंत्रण, मॅप सिस्टिम, वीज वितरण प्रणालीत बिघाड आल्यास मोबाईलवर तत्काळ माहिती, ड्रोनद्वारे शेतात फवारणी, ड्रोनद्वारे मिल्ट्री आॅपरेटिंग ईन कोल माईन्स, ग्रामीण रूग्णालयांची मोबाईलवर कनेक्टिव्हीटी, अ‍ॅड्रॉईड मोबाईलने मोटरसायकल चोरी रोखणे आदी मॉडेल्स लक्षवेधक ठरलीत.
पेपर सादरीकरणातून सामाजिक बोध
विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा विद्यार्थी विवेक मेश्राम यांनी ‘शाळाबाह्य मुले’ या विषयाचा पेपर सादर केला आहे. राज्यात चार लाख मुले ही शाळाबाह्य असून, त्यांना तत्काळ शिक्षणांच्या प्रवाहात आणले नाही तर ही मुले भविष्यात वेगळ्या वळणावर जातील, अशी भीती व्यक्त करण्यात आली. ही मुले उद्याच्या देश निर्मितीचे शिलेदार असणार आहेत. गैरमार्गाने या मुलांचा प्रवास सुरू होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपाययोजनांसंदर्भात मेल पाठविल्याची माहिती विवेक मेश्राम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Control of motorcycles, power failure and equipment through mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.