फेसबुकवरील आक्षेपार्ह छायाचित्राने तणाव
By admin | Published: June 2, 2014 12:37 AM2014-06-02T00:37:50+5:302014-06-02T00:37:50+5:30
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व शिवसेना ..
अमरावती/बडनेरा : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व शिवसेना नेत्यांचे आक्षेपार्ह छायाचित्र फेसबुकवर, अपलोड केल्याने शनिवारी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास बडनेर्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसैनिक, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी महामहामार्गावर रास्ता रोको केला. वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यात तीन वाहनांच्या काचा फुटल्या. या घटनेचे पडसाद अमरावती शहरात शनिवारी रात्री व रविवारी उमटले. दोन्ही शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बंड, महानगरप्रमुख दिगांबर डहाके, ललित झंझाड, महेश भिंडा, मंगेश गाले, राजू धामळे या शिवसेनेच्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त करीत बडनेरा पोलीस स्थानकासमोरुन जाणार्या महामार्गावर ‘रास्ता रोको’ केला. दरम्यान ज्या इसमाच्या मोबाईलवरील फेसबुकवर ओक्षपार्ह छायाचित्र आले त्या अर्जुन प्रल्हाद पवार (३0, रा. शिवाजी फैल, बडनेरा) याने बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महापुरुषांचे आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड करणार्या युवकाला तत्काळ अटक करा, अशी मागणी संतप्त जमावाची होती. तब्बल एक तासापर्यंत कार्यकर्त्यांनी मार्ग रोखून धरला होता. संतप्त कार्यकर्त्यांनी तीन वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर मात्र पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कडू यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची अधिक कुमक बोलावून घेतली. पोलीस उपायुक्त ओमनाथ घार्गे हेदेखील घटनास्थळी पोहोचले व नेत्यांची व कार्यकर्त्यांची समजूत काढली. तातडीने या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतले जाईल, असे आश्वासन दिल्यावर तणाव निवळला. शनिवारी रात्री ११ वाजता ‘रास्ता रोको’ आंदोलन थांबविण्यात आले. यामुळे महामार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी भादंविच्या कलम २९५ आरपीसी ६६ माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार कारवाई केली आहे. रविवारीदेखील सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता. शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त फेसबुकवर आक्षेपार्ह छायाचित्र टाकल्याचे पडसाद अमरावती शहरात पुन्हा उमटण्याची शक्यता लक्षात घेता रविवारी सकाळपासूनच पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्या मार्गदर्शनात बडनेरा, राजापेठ, राजकमल चौक, जयस्तभ चौक, बसस्थानक परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला. उपायुक्त सोमनाथ घार्गे व बी. के. गावराणे हे स्वत: शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.