विषय समितीवर दोन पंचायत समिती सभापती अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:10 AM2021-07-10T04:10:42+5:302021-07-10T04:10:42+5:30

जिल्हा परिषद विशेष सभा; पिठासाठी सभापतीकडून घोषणा अमरावती : जिल्हा परिषदेच्या दहापैकी पाच विषय समितीच्या रिक्त महिला व ...

Controversy over two Panchayat Samiti chairpersons on the subject committee | विषय समितीवर दोन पंचायत समिती सभापती अविरोध

विषय समितीवर दोन पंचायत समिती सभापती अविरोध

Next

जिल्हा परिषद विशेष सभा; पिठासाठी सभापतीकडून घोषणा

अमरावती : जिल्हा परिषदेच्या दहापैकी पाच विषय समितीच्या रिक्त महिला व बालकल्याण विषय समितीवर सदस्य म्हणून चांदूर बाजार पंचायत समितीच्या सभापती वनमाला सुरेश गणेशकर व मोर्शी पंचायत समितीच्या सभापती विणा प्रमोद बोबडे यांची पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीवर अविरोध निवड करण्यात येत असल्याची घोषणा झेडपीच्या विशेष आमसभेत पिठासीन सभापती बबलू देशमुख यांनी केली.

जिल्हा परिषद निवडून आलेल्या ५९ सदस्य व १४ पंचायत समिती सभापती अशा ७३ सदस्यांना प्रत्येकी एका समितीत घेणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषदेत १० समित्यांवरील ८३ जागांवर सध्याच्या स्थितीत ७८ सदस्यांची निवड करण्यात आली. यात १४ सदस्यांना प्रत्येकी दोन समित्यांवर स्थान देण्यात आले आहे. परंतु, बांधकाम, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण या समितीत प्रत्येकी १ जागा रिक्त आहे. यात विशेष समित्यांवर जिल्हा परिषद सदस्यांच्या ३ जागा तसेच २ पंचायत समिती सभापती अशा पाच जागा रिक्त आहे. यातील तीन जागा रिक्त ठेवण्यात आल्या, तर दोन झेडपी सदस्य आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत. तर एका महिला सदस्यांचे गत काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. या तीनही रिक्त जागांवर अद्याप निवडणूक झालेली नाही. त्यामुळे तीन जागा रिक्तच राहणार आहेत. मोर्शी व चांदूर बाजार येथील पंचायत समिती सभापतींनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त जागेवर नव्याने सभापतीपदी म्हणून निवडून आलेल्या सभापतींची वर्णी लागली आहे. जिल्हा परिषदेत रिक्त असलेल्या महिला व बालकल्याण समितीकरिता चांदूर बाजारच्या सभापती वनमाला गणेशकर यांनी, तर पशुसंवर्धन समितीकरिता मोर्शीच्या सभापती वीणा बोबडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे नामाकंन अर्ज सादर केले होते. या दोन्ही समितीकरिता प्रत्येकी एकच अर्ज दाखल करण्यात आला होता. गणेशकर याचे सूचक म्हणून झेडपी सदस्य शाम मसराम, तर बोबडे यांंचे सूचक म्हणून सदस्य शरद मोहोड यांनी जबाबदारी पाडली. अर्जाच्या छाननीत दोन्ही सभापतींचे नामनिर्देश वैध ठरले होते. त्यामुळे या दोन्ही नावावर विशेष सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. सभेला उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, दयाराम काळे, पूजा आमले, सदस्य नितीन गोंडाणे,जयंत देशमुख, शरद मोहोड, दिनेश टेकाम, गजानन राठोड, अनिता मेश्राम, सुखदेव पवार, सारंग खोडस्कर, सुशीला कुकडे व अन्य सदस्य उपस्थित होते. सभेचे सचिव म्हणून डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे यांनी कामकाज पाहिले.

यापूर्वी सभापती ज्या समितीचे सदस्य होते.त्याच समितीवर त्यांना संधी दिली दाट शक्यता आहे. यासाठी ९ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या सभा विशेष सभा आयोजित केली आहे.या समितीच्या रिक्त जागेसाठी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यत चांदूर बाजार व मोर्शी येथील सभापतींना नामांकन दाखल करावयाचे त्यानंतर अर्जदारांची नावे वाचणे,अजार्ची छाननी करणे, अर्ज मागे घेण्याची संधी देणे आदी प्रक्रिया पार पडल्यानंतर निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे.

Web Title: Controversy over two Panchayat Samiti chairpersons on the subject committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.