१५० मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या अंगणवाडीत रूपांतर; सेविकांना पदोन्नती, मदतनीसांची होणार पदभरती

By जितेंद्र दखने | Published: February 26, 2024 11:46 PM2024-02-26T23:46:15+5:302024-02-26T23:46:48+5:30

जिल्ह्यातील चौदा प्रकल्पांत सुमारे २ हजार ५९२ अंगणवाड्या आहेत

Conversion of 150 Mini Anganwadis into Big Anganwadis; Servants will be promoted, helpers will be recruited | १५० मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या अंगणवाडीत रूपांतर; सेविकांना पदोन्नती, मदतनीसांची होणार पदभरती

१५० मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या अंगणवाडीत रूपांतर; सेविकांना पदोन्नती, मदतनीसांची होणार पदभरती

जितेंद्र दखने, अमरावती: जिल्ह्यातील मिनी अंगणवाड्यांचे आता मोठ्या अंगणवाड्यात रूपांतर करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील १५० अंगणवाड्यांचा समावेश आहे. याठिकाणी मदतनिसांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी जि. प.च्या महिला बालकल्याण विभागाकडून रिक्त पद भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या काही महिन्यांत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

राज्यातील हजारो मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या अंगणवाडीत रूपांतर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील चौदा प्रकल्पांतील १५० अंगणवाड्यांचे मोठ्या अंगणवाड्यात रूपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे त्याठिकाणी १५० मदतनीस भरण्यात येणार असल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाने दिली आहे. जिल्ह्यातील चौदा प्रकल्पांत सुमारे २ हजार ५९२ अंगणवाड्या आहेत. त्यातील १५० मिनी अंगणवाड्या ह्या आता मोठ्या अंगणवाडी केंद्रात रूपांतरीत केल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणी मदतनीसांच्या जागा रिक्त राहणार आहेत. त्याठिकाणच्या मदतनीसांच्या जागा भराव्यात, असे आदेश शासनाने दिले आहे. विशेष म्हणजे मिनी अंगणवाडी याठिकाणी काम करत असलेल्या सेविकांना मानधन कमी होते. आता ज्याठिकाणच्या मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या अंगणवाडीमध्ये रूपांतर केल्यामुळे त्या अंगणवाडीतील सेविकांच्या मानधनात वाढ होणार आहे. त्याठिकाणी एका मदतनीसाची भरती करण्यात येणार आहे.

मदतनिसाचे पदे भरणार,मिनी अंगणवाडींना पदोन्नती

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या १४ तालुक्यापैकी धारणी वगळता उर्वरित १३ तालुक्यामधील १५० मिनी अंगणवाडीचे रूपांतर आता अंगणवाडी केंद्रात करण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविक पदावर पदोन्नती मिळणार आहे.तर या अंगणवाडी केंद्रात नव्याने मदतनिसची पदे भरली जाणार आहेत.

राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यात असलेल्या १५० मिनी अंगणवाडी केंद्र अंगणवाडी केंद्रात रूपांतरीत केली आहेत.या ठिकाणी कार्यरत मिनी अंगणवाडी सेविकांना पदोन्नती देवून अंगणवाडी सेविका म्हणून काम पाहतील तर मदतनिसाची पदे लवकरच भरली जातील.
-डॉ.कैलास घोडके, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग जि.प.

अशी आहे मिनी अंगणवाडी केंद्र रूपांतर संख्या 

  • अमरावती-१८भातकुली ०२
  • अचलपूर १८दर्यापूर१४
  • अंजनगाव सुजी-०८चांदूर बाजार १४ मोर्शी-०४ वरूड-०४
  • तिवसा-०८ चांदुर रेल्वे-१३ धामनगांव रेल्वे-०४
  • नांदगाव खंडेश्र्वर-२१ चिखलदरा-०१

Web Title: Conversion of 150 Mini Anganwadis into Big Anganwadis; Servants will be promoted, helpers will be recruited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.