न्यायबंद्याचा उपचारादरम्यान इर्विनमध्ये मृत्यू
By प्रदीप भाकरे | Published: April 2, 2023 02:49 PM2023-04-02T14:49:44+5:302023-04-02T14:51:09+5:30
न्यायालयाच्या आदेशाने १३ ऑगस्ट २०२० पासून कारागृहात बंदिेस्त होता.
प्रदीप भाकरे, अमरावती: येथील मध्यवर्ती कारागृहात बलात्काराच्या गुन्हयात शिक्षा भोगत असलेल्या न्यायबंद्याचा १ एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तुषार गोरखनाथ साखरे (३२, परतवाडा) असे मृताचे नाव आहे. परतवाडा पोलीस ठाण्यात दाखल अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी तुषार हा न्यायालयाच्या आदेशाने १३ ऑगस्ट २०२० पासून कारागृहात बंदिेस्त होता.
दरम्यान त्याला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाल्याने व छातीत दुखत असल्याने त्याच्यावर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील दवाखान्यात उपचार करण्यात आला. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला २९ मार्च रोजी सामान्य रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना १ एप्रिल रोजी सकाळी आठच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. तेथील डॉ. अर्शद सैय्यद यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक भारत भोसले यांच्यातर्फे गोविंद खाडे (३०) या जेल कर्मचाऱ्याने फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी शनिवारी दुपारी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"