अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा २५ मे रोजी; राज्यपाल कोश्यारी राहणार उपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 03:27 PM2022-05-09T15:27:54+5:302022-05-09T15:28:41+5:30
उन्हाचा पारा चढत असल्याने अमरावती विद्यापीठाने पहिल्यांदाच विद्यापीठबाहेर दीक्षांत सोहळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने जोरदार तयारी चालविली आहे.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३८ वा दीक्षांत सोहळा २५ मे रोजी दुपारी ३ वाजता येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तर दीक्षांत भाषण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे करणार आहेत. कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे हे स्वागतपर भाषण, प्रास्ताविक करतील. उन्हाचा पारा चढत असल्याने अमरावती विद्यापीठाने पहिल्यांदाच विद्यापीठबाहेर दीक्षांत सोहळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने जोरदार तयारी चालविली आहे.
या पदवी समारंभात गुणवत्ताधारक विद्यार्थी, पीएचडी, पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. तब्बल ४५ हजारांपेक्षा जास्त पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल, असे संकेत कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी दिले आहेत.