जखमी वन्यप्राण्यांसाठी लावले कुलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:31 PM2019-04-22T22:31:46+5:302019-04-22T22:32:04+5:30

वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गंत येणाऱ्या वन्यप्राणी मदत केंद्रात पाच काळविट, तीन माकड असे आठ जखमी वन्यप्राणी आहेत.उन्हाचा पारा ४२ अंशावर गेल्याने त्यांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्याअनुषंगाने त्यांच्याकरिता कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे.

Cooler for the injured wild animals | जखमी वन्यप्राण्यांसाठी लावले कुलर

जखमी वन्यप्राण्यांसाठी लावले कुलर

Next
ठळक मुद्देवन्यप्राणी मदत केंद्र : वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालयाचा उपक्रम, पारा ४२ अंशांवर

अमोल कोहळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा बंदी : वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गंत येणाऱ्या वन्यप्राणी मदत केंद्रात पाच काळविट, तीन माकड असे आठ जखमी वन्यप्राणी आहेत.उन्हाचा पारा ४२ अंशावर गेल्याने त्यांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्याअनुषंगाने त्यांच्याकरिता कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे.
वन्यप्राणी मदत केंद्रात वाहनाच्या धडकेत जखमी झालेले, पाण्यासाठी भटकणारे, कुत्र्यापासून बचावलेले वन्यप्राणी ठेवले जातात. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांचा प्राण वाचविण्याचे प्रयत्न या वन्यप्राणी मदत केंद्रात केले जाते. सध्या कडाक्याचे उन तापत असल्याने मनुष्याप्रमाणेच वन्यजीवांची होरपळ होत आहे. त्यावर उपाय म्हणून वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर व वर्तुळ अधिकारी राजेश घागरे यांनी जखमी वन्यप्राण्यांना थंडावा मिळावा यासाठी रेस्क्यू सेंटरमध्ये कुलरची व्यवस्था केली आहे. वडाळी वनपरिक्षेत्रात वन्यप्राणी मदत केंद्रात वडाळी वर्तुळाचे वन कर्मचारी नित्यनेमाने जखमी वन्यप्राण्यांना पाणी, गवत, भाजीपाला, दूध पाजण्याचे कार्य पार पाडतात. तालुक्यातील जखमी झालेले वन्यप्राण्यांना दररोज वेळोवेळी लागणारे खाद्य व त्यांची जोपासना या कामात किशोर डाहाके यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. वन्यप्राणी मदत केंद्रात वन्य प्राण्यांकरिता ग्रीन नेट लावण्यात आली आहे. नवीन पिंजरे लावण्यात आले. या पिंजºयामध्ये उपचार पिंजरा, आमिष पिंजरा, वाहतूक पिंजरा याशिवाय पक्षी, लहानमोठे पक्षी याशिवाय तृणभक्षी वन्यप्राण्यांकरिता व्यवस्था केली आहे. मृत वन्यप्राण्यांचे पंचनामे करून येथे दफनविधी करण्यात येते. तसेच वनविभागाचे वाहन ‘वन्यप्राणी वाहिका’ कार्यरत आहे. या उपक्रमाबद्दल उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांनी वडाळी वर्तुळाचे वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांचे कौतुक केले. सोबतच वनविभागाने जंगलातील वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांची अधिकाधिक निर्मितीची अपेक्षा आहे.

या रेस्क्यू सेंटरमध्ये लावण्यात आलेल्या कुलरची व्यवस्था राखण्यासाठी स्वत’त्र यंत्रणा कार्यान्वित आहे. जखमी हरिण व अन्य वन्यप्राण्यांची तापत्या उन्हामुळे प्रकृती बिघडू नये, याकडे वनकर्मचाऱ्यांचे पुर्ण लक्ष आहे.

Web Title: Cooler for the injured wild animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.