कोरोनाचे १० मृत्यू, ३१९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:10 AM2021-06-04T04:10:35+5:302021-06-04T04:10:35+5:30

अमरावती जिल्ह्यात गुरुवारी उपचारादरम्यान नऊ रुग्णाचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १,४७७ वर पोहोचली आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यातील एका ...

Corona 10 deaths, 319 positive | कोरोनाचे १० मृत्यू, ३१९ पॉझिटिव्ह

कोरोनाचे १० मृत्यू, ३१९ पॉझिटिव्ह

Next

अमरावती जिल्ह्यात गुरुवारी उपचारादरम्यान नऊ रुग्णाचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १,४७७ वर पोहोचली आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. गुरुवारी ३१९ नव्या पॉझिटिव्हची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ९३,१६८ झालेली आहे.

जिल्ह्यात गुरुवारी ७,२७१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ४.३८ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद झाल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे. याशिवाय उपचारानंतर बरे वाटल्याने ५४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता संक्रमनमुक्त नागरिकांची संख्या आता ८७,६४० वर पोहोचली आहे. ही ९४.०७ टक्केवारी आहे. अलीकडे पॉझिटिव्हपेक्षा डिस्चार्ज जास्त होत असल्याने संक्रमणमुक्त नागरिकांचा वाढता टक्का आहे.

बॉक्स

२४ तासांतील मृत्यू

जिल्ह्यात उपचारादरम्यान येथील ८१ वर्षीय महिला, न्यू आय.टी.आय, कॉलनी, ७० वर्षीय महिला, कॅम्प, ७४ वर्षीय पुरुष, श्रेयस कॉलनी, ५३ वर्षीय महिला, श्याम नगर तसेच ग्रामीणमधील ५८ वर्षीय पुरुष, वडनेर गंगाई, ६० वर्षीय महिला, शिरखेड, ५० वर्षीय महिला, चांदुर बाजार, ५० वर्षीय महिला, अंजनगाव सुर्जी, ६० वर्षीय पुरुष, अचलपूर याशिवाय ४२ वर्षीय पुरुष, भिलखेडा, कारंजा लाड या रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.

Web Title: Corona 10 deaths, 319 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.