कोरोनाचे १० मृत्यू, ४०७ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:10 AM2021-05-31T04:10:17+5:302021-05-31T04:10:17+5:30
अमरावती : जिल्ह्यात रविवारी कोरोना संसर्गामुळे १० संक्रमितांचा मृत्यू झाल्याने बाधितांच्या मृत्यूची संख्या १,४४९ झाली आहे. याशिवाय नव्या ४०७ ...
अमरावती : जिल्ह्यात रविवारी कोरोना संसर्गामुळे १० संक्रमितांचा मृत्यू झाल्याने बाधितांच्या मृत्यूची संख्या १,४४९ झाली आहे. याशिवाय नव्या ४०७ पॉझिटिव्हची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ९१,८३७ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता कमी व्हायला लागला आहे. याशिवाय संक्रमणमुक्तांचा आलेख वाढायला लागला आहे. रविवारी ८७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत ८४,८८८ नागरिकांना संक्रमणमुक्त झाले आहेत. एकूण संक्रमितांच्या तुलनेत हे प्रमाण ९२.४३ टक्के आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५,५०० आहेत. यामध्ये १,५८९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय अन्य रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्याचा जिल्हा शल्यचिकित्सकांचा अहवाल आहे.
बॉक्स
२४ तासांतील मृत्यू
जिल्ह्यात उपचारादरम्यान ५२ वर्षीय पुरुष (दर्यापूर), ७० वर्षीय महिला (कळमगव्हाण, अचलपूर), ६२ वर्षीय महिला (मार्डी, तिवसा), ६३ वर्षीय पुरुष (बेगमपुरा, अचलपूर), ६७ वर्षीय महिला (सावनेर, नांदगाव खंडेश्वर), ८४ वर्षीय पुरुष (शिवशक्ती नगर, अमरावती), ६८ वर्षीय महिला (अंजनगाव सुर्जी), ८५ वर्षीय पुरुष (जावळा, चांदूर रेल्वे), ५६ वर्षीय पुरुष (घोडचंदी, दर्यापूर), ६५ वर्षीय पुरुष (बेलज, चांदूर बाजार) या दहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.