कोरोना, 50 ते 60 वर्षे वयोगटात सर्वाधिक 109 बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 05:00 AM2020-12-16T05:00:00+5:302020-12-16T05:00:35+5:30

  लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कोरोना संसर्गामुळे नऊ महिन्यांच्या कालावधीत ३९० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये ५० ...

Corona, 109 victims in the age group of 50 to 60 years | कोरोना, 50 ते 60 वर्षे वयोगटात सर्वाधिक 109 बळी

कोरोना, 50 ते 60 वर्षे वयोगटात सर्वाधिक 109 बळी

googlenewsNext
ठळक मुद्देदुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठांची काळजी महत्त्वाची

  लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संसर्गामुळे नऊ महिन्यांच्या कालावधीत ३९० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये ५० ते ६० वर्षे वयोगटातील सर्वाधिक १०९ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या वयोगटातील ज्येष्ठांना सांभाळण्याची कसरत सर्वांनाच करावी लागणार आहे.
 जिल्ह्यात पहिला कोरोनाग्रस्त व संक्रमितांच्या पहिली मृत्यूची नोंद ४ एप्रिल रोजी शहरातील हाथीपुऱ्यात झाली. हा रुग्ण ‘होम डेड’ होता. या महिनाभरात सहा  ‘होम डेड’  रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची नोंद झाली होती. यावेळी जिल्ह्यात संक्रमितांचा मृत्युदर हा राज्यात सर्वाधिक सहा ते सात टक्क्यांपर्यंत राहिला. त्यानंतर मात्र प्रशासनाने विविध सर्वेक्षण, अभियानाच्या माध्यमातून संक्रमितांच्या मृत्यूवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले. आतापर्यंत जिल्ह्यात ३९० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे व हे प्रमाण एकूण पॉझिटिव्ह रुग्णाच्या तुलनेत २.१० टक्के आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणाद्वारे संक्रमितांच्या मृत्यूचे ‘डेथ ऑडिट’ करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे ५० ते ६० वयोगटातील असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, एकूण मृत्यूपैकी ८० टक्के  रुग्णांना कोरोनासोबतच इतरही १४ प्रकारचे आजार मृत्यूला कारणीभूत असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले. याशिवाय लक्षणे अंगावर काढणे, उशिरा निदान व उपचार आदी कारणांमुळेही कोरोनाग्रस्तांचे मृत्यू झाले आहे.
 

महापालिका क्षेत्रात सर्वाधिक २५३ मृत्यू

 जिल्ह्यात आतापर्यंत ३९० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक २५३ मृत्यू महापालिका क्षेत्रात झालेले आहे. या  भागात आतापर्यंत किमान १२ हजार कोरोनाग्रस्तांची नोंद या काळात झालेली आहे. यामध्ये ८० टक्क्यांवर रुग्ण कॉमार्बिड आजाराचे असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

 जिल्हा ग्रामीणमध्ये नऊ महिन्यांच्या कालावधीत सहा हजारांवर कोरोनाग्रस्तांची नोंद झाली व उपचारादरम्यान १३७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आहे. कोरोना संसर्गापूर्वी असलेले अन्य आजार संक्रमण झाल्यावर मृत्यूचे कारण ठरल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक बळी

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या ३९० मृत्यूपैकी  सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक १५१ रुग्णांचा बळी गेला. एप्रिलमध्ये १०, मेमध्ये ५, जूनमध्ये ९, जुलैमध्ये ४०, ऑगस्टमध्ये ७६, ऑक्टोबरमध्ये ७३, नोव्हेंबरमध्ये १४ व डिसेंबर महिन्यात आतापर्यंत १२ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये २९३ पुरुष व ९७ महिला संक्रमितांचा समावेश आहे.

Web Title: Corona, 109 victims in the age group of 50 to 60 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.