कोरोना ११२५ संक्रमित, १३ रूग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:13 AM2021-05-08T04:13:13+5:302021-05-08T04:13:13+5:30
अमरावती : एप्रिल, मे महिन्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी होत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी कोरोनाचे ११२५ संक्रमित आढळून आले ...
अमरावती : एप्रिल, मे महिन्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी होत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी कोरोनाचे ११२५ संक्रमित आढळून आले असून, १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हा परिणाम मानला जात आहे. अलीकडे ग्रामीण भागात कोरोनाचे रूग्ण बहुसंख्येने आढळून येत आहे. त्यामुळे अमरावती शहरातील आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे.
स्थानिक साईनगर येथल ८२ वर्षीय महिला, किरणनगर येथील ५८ वर्षीय पुरूष, तिवसा वाठोडा खुर्द येथील ४८ वर्षीय महिला, खोलापुरी गेट येथील ७५ वर्षीय पुरुष, अचलपूर येथील ५० वर्षीय पुरूष, म्हाडा कॉलनी येथील ७० वर्षीय पुरुष, पूर्णानगर येथील ८४ वर्षीय पुरुष, वरूड येथील ६५ वर्षीय महिला, अचलपूर येथील ५० वर्षीय पुरुष, चांदूर बाजार येथील ५० वर्षीय पुरूष महेंद्र काॅलनी येथील ४० वर्षीय पुरुष तर अन्य जिल्ह्यातील वर्धा कारंजा घाडगे येथील ७४ वर्षीय पुरुष, नागपूर येथील ७० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शुक्रवारी ११२५ संक्रमित आढळून आल्याने आतापर्यंत ७३ हजार ८ एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची नाेंद करण्यात आली आहे. २१६० रूग्ण दाखल असून, ८२६ रूग्णांनी कोरोनावर मात करून घरी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. गृहविलगीकरणात महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १४ हजार ५८८ तर ग्रामीण भागात ५५८२ रुग्णांनी उपचार घेतला आहे. आतापर्यंत १०८० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ॲक्टिव्ह रूग्ण ९९६१, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.८८ टक्के आहे. रुग्ण दुपटीचे प्रमाण ६६ एवढे असून, मृत्युदर १.४८ टक्के आहे. आतापर्यंत ४ लाख ४७ हजार ८३२ नमुने चाचणी करण्यात आली आहे.