कोरोना, १७ मृत्यू, १,०१६ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:14 AM2021-05-12T04:14:11+5:302021-05-12T04:14:11+5:30
अमरावती : जिल्ह्यात मंगळवारी १४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने दगावलेल्या संक्रमितांची एकूण संख्या १,१५१ झाली आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यांतील ...
अमरावती : जिल्ह्यात मंगळवारी १४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने दगावलेल्या संक्रमितांची एकूण संख्या १,१५१ झाली आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यांतील तीन रुग्णांचाही मृत्यू झाला. मंगळवारी १,०१६ पॉझिटिव्ह अहवाल आल्याने जिल्ह्यात आतापर्यंत ७७,४५६ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी ४,५११ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २२.५२ टक्के पॉझिटिव्हिटीची नोंद झाली आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये वरूड, अचलपूर, मोर्शी, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे, तिवसा व धारणी तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. ग्रामीणमध्ये फेब्रुवारी महिन्यात ३,६२५, मार्चमध्ये ६,१५२, एप्रिल महिन्यात १०,९९२ व १० मेपर्यत ७,७२९ कोरोना संक्रमितांची नोंद झालेली आहे. याशिवाय मंगळवारी संक्रमणमुक्त झालेल्या ९११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनातून एकूण ६६,७२३ अमरावतीकर बरे झाले आहेत. ही टक्केवारी ८४.८५ आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ६६ दिवसांवर पोहोचल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
बॉक्स
मंगळवारी २४ तासांतील मृत्यू
(कृपया पाच ओळी सोडाव्या)