कोरोना, १९ मृत्यू, ७०४ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:12 AM2021-04-25T04:12:54+5:302021-04-25T04:12:54+5:30
अमरावती : जिल्ह्यात शनिवारी पुन्हा १९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात १४ मृत्यू अमरावती जिल्ह्यातील असल्याने बाधितांच्या मृत्यूची संख्या ...
अमरावती : जिल्ह्यात शनिवारी पुन्हा १९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात १४ मृत्यू अमरावती जिल्ह्यातील असल्याने बाधितांच्या मृत्यूची संख्या ८६१ झालेली आहे. याशिवाय अन्य पाच मृत नागपूर, वर्धा व मध्यप्रदेशातील आहेत. शनिवारी नवे ७०४ रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्यात बाधितांची संख्या ६०,४८० झालेली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी २२ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद झाल्याने चिंतेत भर पडली होती. मात्र, शनिवारी ६,२९५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ११.१८ टक्के पॉझिटिव्हिटीची नोंद झाल्याने दिलासा मिळाला आहे. कोरोना संसर्गात कमी यावी. याकरिता संचारबंदीचे सुधारित आदेश जारी केलेत. हे एक प्रकारचे मिनी लॉकडाऊनच आहे. यात आता कठोर अंमलबजावणी होत असल्याने सुपरस्प्रेडर यांना अटकाव झालेला आहे. रेल्वे व बसमध्ये प्रवाशांच्या हातावर शिक्का मारला जात आहे. याशिवाय प्रवाशांच्या नोंदी घेतल्या जात असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. जिल्ह्यात शनिवारी ऑक्सिजनचा एक टँकर उपलब्ध झालेला असला तरी कोरोना प्रतिबंधक लस व रेमेडेसिवीर इंजेक्शनचा मात्र, अद्यापही तुटवडा असल्याची वस्तुस्थिती आहे.
बाॅक्स
जिल्ह्यात १४ मृत्यू
जिल्ह्यात उपचारादरम्यान ७० वर्षीय पुरुष, चांदूर बाजार, ६८ वर्षीय महिला, (राजुरा), ४८ वर्षीय पुरुष, (जुनी वस्ती,बडनेरा), ६० वर्षीय पुरुष, (आदर्श नगर, अमरावती), ६८ वर्षीय पुरुष, (भानखेडा खुर्द), ७० वर्षीय महिला, (अशोक कॉलनी, अमरावती) ७० वर्षीय महिला, (अंबिका नगर, अमरावती), ३९ वर्षीय पुरुष, (चांदुर रेल्वे), ६० वर्षीय पुरुष, (उतखेड, मोर्शी), ६०, पुरुष, (लोणी), ६५ वर्षीय महिला, (मीनाक्षी कॉलनी, अमरावती), ७५ वर्षीय पुरुष, (राजुरा, वरुड), ५० वर्षीय पुरुष, (वरुड) व ५५ वर्षीय पुरुष, (यशोदा नगर, अमरावती) या १४ रुग्णांचा
मृत्यू झाला.
बॉक्स
अन्य जिल्ह्यातील पाच मृत्यू
जिल्ह्यात उपचार घेताना अन्य जिल्ह्यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली. यामध्ये ६२ वर्षीय पुरुष, (नागपूर), ५१ वर्षीय पुरुष, (नागपूर), ६५ वर्षीय पुरुष, (बैतुल, मध्यप्रदेश), ६० वर्षीय पुरुष, (आर्वी,वर्धा), ६८ वर्षीय पुरुष, (साईखेडा, मध्यप्रदेश),या रुग्णांचा समावेश आहे.