कोरोना १९ मृत्यू, ८७९ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:14 AM2021-05-21T04:14:28+5:302021-05-21T04:14:28+5:30
अमरावती : जिल्ह्यात उपचारादरम्यान गुरुवारी १९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या १,३२१ झाली आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यातील एका ...
अमरावती : जिल्ह्यात उपचारादरम्यान गुरुवारी १९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या १,३२१ झाली आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गुरुवारी ८७९ कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने जिल्ह्यात संक्रमितांची संख्या ८६,१७८ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात १८ मे रोजी १८.१६ टक्के पॉझिटिव्हिटीची नोंद झाली. मात्र, दुसऱ्याच दिवशी २२.३३ टक्के अशी पॉझिटिव्हिटी नोंद झाली. गुरुवारी ३,५४१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात २४.८२ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद करण्यात आलेली आहे. संचारबंदीच्या या १३ दिवसांत जिल्ह्यात संसर्गात कमी आलेली नसल्याचे दिसून येते. जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी १५ टक्क्यांवर असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी व्हिसीद्वारे संवाद साधला आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालानुसार गुरुवारी उपचारानंतर बरे वाटल्याने १,००५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे संक्रमणमुक्त झालेल्या नागरिकांची संख्या ७५,२८९ झालेली आहे. ही ८७.३६ टक्केवारी आहे.
बॉक्स
गुरुवारी २४ तासांतील मृत्यू
उपचारादरम्यान ४८ वर्षीय महिला, गाडगेनगर, २९ वर्षीय पुरुष, अर्जुननगर, ८३ वर्षीय महिला, कठोरा रोड, ७९ वर्षीय महिला, गाडगेनगर, तसेच ग्रामीणमधील ७८ वर्षीय महिला, मोर्शी, ८० वर्षीय पुरुष, शेंदूरजना घाट, ७२ वर्षीय पुरुष, अंजनगाव सुर्जी, ७० वर्षीय महिला, नांदगाव खंडेश्वर, ६० वर्षीय महिला, देवरा, ५० वर्षीय महिला, अचलपूर, ४८ वर्षीय महिला, वरूड, ७७ वर्षीय महिला, मोर्शी, ७४ वर्षीय पुरुष, नांदगाव खंडेश्वर, ७० वर्षीय पुरुष, मोर्शी, ७६ वर्षीय पुरुष, तिवसा, ५७ वर्षीय महिला, अंजनगाव सुर्जी, ८० वर्षीय महिला, परसापूर, अचलपूर, ७५ वर्षीय पुरुष, भंडारज, अंजनगाव सुर्जी या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.