कोरोना, २० दिवस, १९,४९१ रुग्ण, ३५५ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:12 AM2021-05-21T04:12:59+5:302021-05-21T04:12:59+5:30
अमरावती : जिल्ह्यात मे महिन्यात कठोर संचारबंदी असतानाही २० दिवसांत १९,४९१ कोरोनाग्रस्त व ३५५ रुग्णांची नोंद झालेली आहे. ...
अमरावती : जिल्ह्यात मे महिन्यात कठोर संचारबंदी असतानाही २० दिवसांत १९,४९१ कोरोनाग्रस्त व ३५५ रुग्णांची नोंद झालेली आहे. या काळात जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी २२ ते २८ टक्क्यांच्या दरम्यान राहिल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ७ मेपासून कठोर संचारबंदीचे आदेश जारी केले आहे. हे एक प्रकारचे लॉकडाऊन असल्यामुळे कोरोनाची साखळी खंडित होईल, अशी अपेक्षा असताना जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच राहिला. आतापर्यंतचे कोरोनाग्रस्तांचे उच्चांक याच कालावधीत झालेले आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात आता मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत ५० टक्के रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. मृतांची टक्केवारीदेखील याच प्रमाणात असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात १ मे रोजी कोरोनाग्रस्तांची संख्या ६६,६९० होती तर २० मे रोजी ८६,१७८ वर पोहोचली आहे. याशिवाय १ मे रोजी ९६६ मृत्यूंची नोंद झाली होती ती आता २० मे पर्यत १३२१ वर पोहोचली आहे. याशिवाय संक्रमनमुक्त नागरिकांची संख्या १ मे रोजी ५७,५९६ होती. ती आता ७५,२८९ वर पोहोचली आहे. एकूण संसर्गाची स्थिती गंभीर असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.
बॉक्स
पॉझिटिव्हिटी वाढतीच
जिल्ह्यात तीन दिवसांत संसर्गात काही प्रमाणात कमी आली असली असली तरी आठ तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. यात १७ तारखेला ८७० रुग्ण व २४.४१ टक्के पॉझिटिव्हिटी, १८ तारखेला ७९८ पॉझिटिव्ह व १८.१६ टक्के पॉझिटिव्हिटी, १९ तारखेला ७९१ पॉझिटिव्ह व २२.३३ टक्के पाॅझिटिव्हिटी याशिवाय २० तारखेला ८९७ रुग्ण व २४.८२ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद करण्यात आलेली आहे.
पॉईंटर
कोरोना जिल्हास्थिती
एकूण रुग्ण : ८६,१७८
कोरोनामुक्त : ७५,२८९
एकूण मृत्यू : १,३२१