कोरोनाने २० मृत्यू, ८७० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:13 AM2021-05-18T04:13:58+5:302021-05-18T04:13:58+5:30
अमरावती : जिल्ह्यात सोमवारी उपचारादरम्यान २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १२७० वर पोहोचली आहे. याशिवाय ८७० पॉझिटिव्हची ...
अमरावती : जिल्ह्यात सोमवारी उपचारादरम्यान २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १२७० वर पोहोचली आहे. याशिवाय ८७० पॉझिटिव्हची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ८३ हजार ८०० झालेली आहे.
जिल्ह्यात दोन आठवड्यांनंतर कोरोनाग्रस्तांची संख्या कमी आलेली असली तरी रविवारी चाचण्या कमी झाल्याने नव्या रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. प्रत्यक्षात सोमवारी ३,६४७ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २४ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद झालेली आहे. ग्रामीणमध्ये वरूड, अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे, तिवसा, धारणी व धामणगाव रेल्वे हे तालुके सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. जिल्ह्यात रोज नोंद होणाऱ्या पॉझिटिव्हमध्ये ७० ते ७५ टक्के रुग्ण याच ‘हॉटस्पाॅट’ तालुक्यांमधील आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार उपचारानंतर बरे वाटल्याने १,१२६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनामुक्त नागरिकांची संख्या ७२,१३४ वर पोहोचली आहे. याशिवाय रुग्ण दुपटीचा कालावधी ५४ दिवसांवर आल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या १०,३९६ आहे. यामध्ये विविध रुग्णालयांत २,२४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर अन्य रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
बॉक्स
सोमवारी २४ तासांतील मृत्यू
(कृपया पाच ओळी जागा सोडावी)