कोरोना, २४ मृत्यू, ११८८ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:13 AM2021-05-14T04:13:30+5:302021-05-14T04:13:30+5:30
अमरावती : जिल्ह्यात गुरुवारी २४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १,१९५ वर पोहोचली आहे. याशिवाय १,१८८ पॉझिटिव्हची ...
अमरावती : जिल्ह्यात गुरुवारी २४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १,१९५ वर पोहोचली आहे. याशिवाय १,१८८ पॉझिटिव्हची नव्याने नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ७९,७३६ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी ४,८५६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात २४.४६ टक्के पॉझिटिव्हिटी नोंदविण्यात आलेली आहे. जिल्ह्यात एक महिन्यांपासून संचारबंदी सुरू असतानाही कोरोनाचा संसर्ग काहीच कमी झालेला नाही. आता पुन्हा १५ दिवस संचारबंदी वाढविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या माहितीनुसार उपचारादरम्यान बरे वाटल्याने ९०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ६७,४३० रुग्णांना संक्रमणमुक्त करण्यात आले. ही ८४.५६ टक्केवारी आहे. याशिवाय संसर्ग वाढता असल्याने रुग्णसंख्या वाढायला लागली. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी हा ५४ दिवसांवर आलेला आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण १.५० टक्क्यांवर पोहोचले आहे.
बॉक्स
२४ तासांत २४ मृत्यू
उपचारादरम्यान शहरातील ६५ वर्षीय महिला, महावीर नगर, ७२ वर्षीय पुरुष, राम नगर, ६८ वर्षीय पुरुष, जलाराम नगर, ६८ वर्षीय पुरुष, जलाराम नगर, ६८ वर्षीय पुरुष, जलाराम नगर, ९० वर्षीय पुरुष, विलास नगर, ७५ वर्षीय पुरुष, जरूड, ७० वर्षीय पुरुष, पिंपळगाव, ६५ वर्षीय महिला, खानापूर, ७५ वर्षीय महिला, पांढरी, ५३ वर्षीय महिला, धामणगाव रेल्वे, ६८ वर्षीय पुरुष, धामणगाव, ६२ वर्षीय महिला, तिवसा, ५५ वर्षीय पुरुष, चोर माऊली, ५६ वर्षीय पुरुष, धामणगाव रेल्वे, ३७ वर्षीय पुरुष, तळेगाव दशाशर,३८ वर्षीय पुरुष, शे.घाट, वरुड,६८ वर्षीय पुरुष, जलाराम नगर, ६०, महिला, देवरा, ७३ वर्षीय पुरुष, चांदुर रेल्वे, ७० वर्षीय पुरुष, अंजनगाव सुर्जी, ६० वर्षीय पुरुष, शेंदूरजना घाट, ६८ वर्षीय पुरुष, बेलोरा, चांदुर बाजार, ५२ वर्षीय पुरुष, अडगाव, ७२ वर्षीय पुरुष, अचलपूर व ५२ वर्षीय पुरुष, चिखलदरा या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.