कोरोना २७ मृत्यू, ११८६ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:13 AM2021-05-10T04:13:10+5:302021-05-10T04:13:10+5:30
जिल्ह्यात रविवारी ४,३८६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २७.०४ टक्के पाॅझिटिव्हिटी नोंद झालेली आहे. म्हणजेच जिल्ह्यातील संसर्गाचे प्रमाण अद्यापही ...
जिल्ह्यात रविवारी ४,३८६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २७.०४ टक्के पाॅझिटिव्हिटी नोंद झालेली आहे. म्हणजेच जिल्ह्यातील संसर्गाचे प्रमाण अद्यापही गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांद्वारा रविवार दुपारी १२ पासून १५ मेचे रात्री १२ पर्यत संचारबंदी जाहीर केलेली आहे. यामुळे संसर्गात किती कमी येणार याची माहिती लॉकडाऊन संपल्याचे पुढच्या आठवड्यात समजू शकणार आहे. मात्र, या आठ दिवसांच्या काळात सुपरस्प्रेडर घरात अडकून राहल्याने संसर्गामध्ये निश्चित कमी येणार आहे.
जिल्हाशल्य चिकित्सकांच्या अहवालानुसार रविवारी उच्चांकी ९३४ रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, आतापर्यंत ६३,८४७ जन संक्रमणमुक्त झाले आहेत. ही टक्केवारी ८४.६४ टक्के आहे. याशिवाय जिल्ह्याचा मृत्युदर १.४९ टक्के आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६६ दिवसांवर आल्याने आरोग्य विभागाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
बॉक्स
(किमान सहा ओळी जागा सोडावी)