कोरोना, यंदा ४०,४८२, आतापर्यंत ६०,४८० बाधितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:11 AM2021-04-26T04:11:26+5:302021-04-26T04:11:26+5:30

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे शनिवारपर्यंत ६०,४८० संक्रमितांची नोंद झाली. यात यंदा १ जानेवारीपासून ४०,४८२ नागरिकांना कोरोनाचा डंख लागल्याची ...

Corona, 40,482 this year, 60,480 so far | कोरोना, यंदा ४०,४८२, आतापर्यंत ६०,४८० बाधितांची नोंद

कोरोना, यंदा ४०,४८२, आतापर्यंत ६०,४८० बाधितांची नोंद

Next

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे शनिवारपर्यंत ६०,४८० संक्रमितांची नोंद झाली. यात यंदा १ जानेवारीपासून ४०,४८२ नागरिकांना कोरोनाचा डंख लागल्याची धक्कादायक बाब स्पष्ट झाली आहे. या कालावधीत ४६५ रुग्ण उपचारादरम्यान दगावले आहे, तर जिल्ह्यात आतापर्यंत ८६१ मृत्यूंची नोंद झालेली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण वर्षभरापूर्वी ४ एप्रिल रोजी नोंदविला गेला. त्यानंतर महिनाभरात ४० पॉझिटिव्ह व १० मृत्यूची नोंद झाली होती. दुसऱ्याच महिन्यापासून महानगरात संसर्ग वाढायला लागला. मे महिन्यात १७८ रुग्णांची नोंद झाली व या महिन्यात ९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जून महिन्यात ३४६ पाझिटिव्ह व ९ संक्रमितांचा मृत्यू झाला. जुलै महिन्यात पाचपट रुग्णसंख्या वाढली. तब्बल १,५९३ संक्रमितांची नोंद झाली व या महिन्यात ४० बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून ग्रामीणमध्येही रुग्णांच्या नोंदी वाढायला लागल्या. या महिन्यात ३,४७३ पॉझिटिव्ह अन् ७४ संक्रमितांचे मृत्यू झालेले आहेत. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात ब्लास्ट झाला. तब्बल ७,७१३ पॉझिटिव्ह अन् १५४ मृत्यू झाले. ऑक्टोबरला कोरोनाचा ग्राफ माघारला. या महिन्यात २,९६९ कोरोनाग्रस्तांनी नोंद व ७२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. नोव्हेंबरमध्ये १,७८२ रुग्ण निष्पन्न झाले. या महिन्यात १४ मृत्यू झाले. डिसेंबर महिन्यात १,७८२ रुग्ण व १८ मृत्यू झालेले आहेत. एकूण या वर्षभरात १९,६६८ पॉझिटिव्ह व ३९६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.

बॉक्स

यंदा ४५१ बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात गत वर्षी ३९६ कोरोना संक्रमितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर यंदा ४५१ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णसंख्या वाढायला लागली. मार्च महिन्यात १६४ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. एप्रिल महिन्यात ही संख्या पार होणार, अशी स्थिती आहे. सध्या रोज २० वर रुग्णांचे मृत्यू होत असल्याचे अहवालावरून स्पष्ट होते.

बॉक्स

फेब्रुवारीपासून कोरोना संसर्गाचा उद्रेक

यंदा जानेवारी महिन्यात २,२१९ पॉझिटिव्ह अन् २२ मृत्यू झालेले आहेत. फेब्रुवारीत १३,२३० रुग्ण व ९२ मृत्यू झाले. मार्च महिन्यात १३,५१८ पॉझिटिव्ह व १६४ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय एप्रिल महिन्याच्या २४ दिवसांत ११,५५७ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली व १७० रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

पाईंटर

४ एप्रिलपासून असे वाढले रुग्ण

दिवस रुग्णसंख्या

१७ सप्टेंबर (१६७ दिवसांत) १०,०००

०५ जानेवारी (१०९ दिवसांत) २०,०००

२२ फेब्रुवारी (४८ दिवसांत) ३०,०००

०९ मार्च (१७ दिवसांत ) ४०,०००

०५ एप्रिल (२८ दिवसांत) ५० ,०००

२४ एप्रिल (१९ दिवसांत) ६०,४८०

Web Title: Corona, 40,482 this year, 60,480 so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.