कोरोना: शुक्रवारी ८९३ पॉझिटिव्ह, १७ रुग्ण दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:12 AM2021-05-22T04:12:50+5:302021-05-22T04:12:50+5:30

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड ॲन्टिजेन तपासणी तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार ...

Corona: 893 positive, 17 patients betrayed on Friday | कोरोना: शुक्रवारी ८९३ पॉझिटिव्ह, १७ रुग्ण दगावले

कोरोना: शुक्रवारी ८९३ पॉझिटिव्ह, १७ रुग्ण दगावले

Next

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड ॲन्टिजेन तपासणी तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार शुक्रवारी एकूण ८९३ संक्रमित रुग्ण आढळले. १७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोना संक्रमितांची संख्या कमी हाेत नसल्याने जिल्हा प्रशासनाची भंबेरी उडाली आहे.

कोविड १९ आजारावर उपचार घेताना १७ जण दगावले. यात चांदूर बाजार येथील ५५ वर्षीय महिला, आष्टी बेलोरा येथील ६५ वर्षीय पुरूष, स्थानिक जेवडनगर येथील ४८ वर्षीय पुरुष, केवल कॉलनी येथील ५६ वर्षीय पुरुष, मोतीनगर येथील ३५ वर्षीय पुरुष, लोणी येथील ५० वर्षीय पुरुष, वरूड येथील ७५ व ३८ वर्षीय पुरुष, दर्यापूर येथील ५२ वर्षीय पुरुष, शिराळा येथील ७४ वर्षीय पुरुष, अकोट येथील ८० वर्षीय पुरुष, दर्यापूर सावंगा येथील ४५ वर्षीय पुरुष, देवरा देवरी येथील ५० वर्षीय पुरुष, आसेगाव पूर्ण येथील ६२ वर्षीय पुरुष, मोर्शी शिजरगाव येथील ४२ वर्षीय पुरुष, स्थानिक हैदरपुरा येथील ७० वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.

शुक्रवारी ८९३ संक्रमित रूग्ण आढळून आले असून, आतापर्यत ८७ हजार ७१ पॉझिटिव्ह नोंद करण्यात आली आहे. विविध रूग्णालयात १९४२ रूग्ण उपाचारासाठी दाखल आहे. कोरोनावर मात करुन १०१६ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहे. गृह विलगिकरणात महापालिका क्षेत्रात आतापर्यत १६ हजार ५६२ तर, ग्रामीण भागात २२ हजार ९७० रूग्णांचा समावेश आहे. १७ जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यत १३३८ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे. ॲक्टिव्ह रूग्ण ९४२८ तर रिकव्हरी रेट ८७.६४ एवढा आहे. दुपट्टीचा दर ५४, मृत्यूदर १.५४ टक्के आहे. आतापर्यंत ५ लाख ११ हजार ७७९ नमुने चाचणी करण्यात आले आहे.

Web Title: Corona: 893 positive, 17 patients betrayed on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.