कोरोना, पुन्हा २५ मृत्यू, ९३४ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:16 AM2021-04-30T04:16:42+5:302021-04-30T04:16:42+5:30
अमरावती : कोरोना संसर्गात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी पुन्हा २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात २१ रुग्ण ...
अमरावती : कोरोना संसर्गात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी पुन्हा २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात २१ रुग्ण जिल्ह्यातील आहे. बाधितांच्या मृत्यूची संख्या ९३६ वर पोहोचली आहे. याशिवाय चार रुग्ण अन्य जिल्ह्यातील आहे. गुरुवारी ९३४ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ६४,७५२ झालेली आहे.
जिल्ह्यात महापालिका क्षेत्रात ३५ टक्के, तर जिल्हा ग्रामीणमध्ये ६५ टक्क्यांवर कोरोनाग्रस्तांची नोंद होत असल्याने चिंतेची बाब आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार गुरुवारी ४,००३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात २३.३३ पॉझिटिव्हिटीची नोंद ही गंभीर मानली जात आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाचे मिनी लॉकडाऊन लागू केले असताना यात रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे पुन्हा आणखी कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.
कोरोना संसर्गाचे वर्षभरात अमरावती शहरात रोज होणारी कोरोनाग्रस्तांची नोंद अधिक राहत होती. मात्र. महिनाभरात ग्रामीण भागात संसर्ग वाढताच आहे. यात भातकुली व चिखलदरा वगळता १२ तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट झालेले आहे. त्यामुळे सीईओंद्वारा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कोट
ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. याबाबत सर्व यंत्रणेची बैठक घेऊन निर्देश दिले आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही.
- शैलेश नवाल,
जिल्हाधिकारी
बॉक्स
जिल्ह्यातील २० रुग्णांचा मृत्यू
उपचारादरम्यान जिल्ह्यातील ६२ वर्षीय पुरुष, (धारणी), ८६ वर्षीय पुरुष, (अचलपूर), ५० वर्षीय पुरुष, (धारणी), ३० वर्षीय पुरुष, (डोंगर यावली),५७ वर्षीय पुरुष, (भातकुली), ७३ वर्षीय महिला, (गणेश नगर, अमरावती), ५० वर्षीय पुरुष, (धामणगाव रेल्वे), ६८ वर्षीय पुरुष, (जमील कॉलनी, अमरावती), ४० वर्षीय पुरुष, (समर्पण कॉलनी, अमरावती), ८० वर्षीय महिला, (वाठोडा, वरूड), २६ वर्षीय पुरुष, (इर्विन वसाहत), ६० वर्षीय महिला, (जरूड, वरुड), ५५ वर्षीय महिला, (अंजनगाव सुर्जी), ६० वर्षीय पुरुष, (हरीसाल), ६३ वर्षीय महिला, (फारशी स्टॉप, अमरावती), ८५ वर्षीय पुरुष, (श्रेयस कॉलनी, अमरावती), ५५ वर्षीय पुरुष,(चिंचोली), ६० वर्षीय पुरुष, (धानवाडी, अंजनगाव), ७४ वर्षीय पुरुष, (यशोदा नगर) व ५० वर्षीय महिला, (बागापूर, चांदूर रेल्वे) या रुग्णांचा मृत्यू झाला.
बॉक्स
अन्य जिल्ह्यातील चार मृत्यू
अन्य जिल्ह्यातील पाच रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे. यामध्ये ६८ वर्षीय पुरुष, (नेर, यवतमाळ), २८ वर्षीय पुरुष, (अकोला), ६५ वर्षीय महिला, खापरखेडा, (नागपूर), ५३ वर्षीय पुरुष, (चंद्रपूर) व ४८ वर्षीय पुरुष, (पांढुर्णा, मध्यप्रदेश) या रुग्णांचा समावेश आहे.