कोेरोना, पुन्हा तीन मृत्यू, ३४८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:08 AM2021-03-29T04:08:19+5:302021-03-29T04:08:19+5:30

अमरावती : जिल्ह्यात रविवारी पुन्हा तीन कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ६६० वर पोहोचली आहे. याशिवाय ३४८ ...

Corona, again three deaths, 348 positive | कोेरोना, पुन्हा तीन मृत्यू, ३४८ पॉझिटिव्ह

कोेरोना, पुन्हा तीन मृत्यू, ३४८ पॉझिटिव्ह

Next

अमरावती : जिल्ह्यात रविवारी पुन्हा तीन कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ६६० वर पोहोचली आहे. याशिवाय ३४८ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४८,०२७ झालेली आहे.

जिल्ह्यात रविवारी ३,२५७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात १०.६५ पाॅझिटिव्हिटीची नोंद झालेली आहे. दोन दिवसांपूर्वी सहा हजारांवर गेलेल्या कोरोना चाचण्या आता पुन्हा कमी झालेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा रुग्णसंख्येत कमी आलेली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाद्वारा जिल्ह्याला रोज चार हजार चाचण्यांचे उद्दिष्ट्य देण्यात आलेले असताना आता चाचण्यांची संख्या कमी होत आहे.

महापालिकेतर्फे नवाथे चौक येथे आयसोलेशन दवाखान्‍यात ज्‍येष्‍ठांसाठी लसीकरण सुरू करण्‍यात आले आहे. दरम्यान, जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारी या केंद्राला भेट दिली. लसीकरणासाठी नागरिकांना काही अडचणी येत असेल तर त्‍यांनी केंद्रावर जाऊनच नोंदणी करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी आशा वर्कर यांच्‍याशी त्यांनी चर्चा केली. १ एप्रिलपासून ४५ वर्षे पूर्ण झालेल्‍या नागरिकांचेही लसीकरण करण्‍यात येणार आहे. ज्‍या नागरिकांची नोंदणी होत नसेल त्‍यांनी केंद्रावर जाऊन नोंदणी करून लसीकरणाचा लाभ घ्‍यावा, असे आवाहनही यावेळी त्‍यांनी केले. यावेळी महापालिका आयुक्‍त प्रशांत रोडे, वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी विशाल काळे, डॉ.देवेंद्र गुल्‍हाने आदी उपस्थित होते.

बॉक्स

रविवारी तीन रुग्णांचा मृत्यू

(कृपया तीन ओळी जागा सोडावी)

Web Title: Corona, again three deaths, 348 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.