जिल्हा न्यायालयात कोरोना ब्लास्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:22 AM2021-02-18T04:22:51+5:302021-02-18T04:22:51+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे. रोज साडेचारशेपेक्षा अधिक रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत. जिल्हा व सत्र ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे. रोज साडेचारशेपेक्षा अधिक रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत. जिल्हा व सत्र न्यायालयातही कोरोनाचे शिरकाव केला आहे. दोन आठवड्यात कोरोना ब्लास्ट झाला. ६७ वकिलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष महेंद्र तायडे यांनी दिली.
जिल्हा न्यायालयात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, न्यायालयाच्या कामाकाजात थोडी शिथिलता मिळावी, याकरिता अमरावती जिल्हा वकील संघाच्यावतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिशांकडे एक निवेदन त्यांनी मंगळवारी सादर केले. यामध्ये पुढील १५ दिवसांसाठी न्यायालयीन कामकामजात शिथिलता मिळण्यात यावी, या काळात याडवर्स ऑर्डर पास करू नये, समन्स किंवा वारंट बजावू नये, न्यायालात पक्षकारांची किंवा वकिलांची गर्दी टाळण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलावी. याकरिता निवेदन सादर केले असून, त्या अनुषंगाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने सदर निवेदन उच्च न्यायालयाकडे पाठविले आहे.
कोट
गत दोन आठवड्यात ६० पेक्षा जास्त वकिलांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आमच्याकडे वकिल बांधवांकडून प्राप्त झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी न्यायालयीन कामकाजात थोडी स्थिलता मिळण्याच्या दृष्टीकोणातून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिशांकडे निवदेन सादर केले आहे.
- महेंद्र तायडे, अध्यक्ष अमरावती जिल्हा वकील संघ