कोरोना ब्लास्ट; आठ मृत्यू ,५२२ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:12 AM2021-04-14T04:12:39+5:302021-04-14T04:12:39+5:30
अमरावती : कोरोनाच्या वाढत्या संसर्गात बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी पुन्हा आठ बाधितांचे ...
अमरावती : कोरोनाच्या वाढत्या संसर्गात बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी पुन्हा आठ बाधितांचे मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या आता ७२६ झालेली आहे. याशिवाय ५२२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात आतापर्यंत ५३,३१४ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे.
जिल्ह्यात २० दिवसांनंतर कोरोनाग्रस्तांची संख्या ५०० क्राॅस झालेली आहे. विशेष म्हणजे पॉझिटिव्हिटितही वाढ झालेली आहे. मंगळवारी २,६४१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता, ५२२ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहे. यामध्ये १९.७६ टक्के पॉझिटिव्हिटी नोंदविण्यात आलेली आहे. मागच्या आठवड्यांपर्यंत नमुन्यांत ७ ते ९ टक्क्यांपर्यंत नोंद करण्यात आली होती. त्यानंतर सलग चार दिवसांपासून पॉझिटिव्हिटीत होत असलेली वाढ चिंताजनक आहे. अशीच वाढ कायम राहिल्यास येत्या आठवड्यात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती निर्माण झालेली आहे. यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यावर भर देणे महत्त्वाचे असताना याकडे संपूर्ण जिल्ह्यात दुर्लक्ष केले जात असल्याची वस्तुस्थिती आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार मंगळवारी ४३५ रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने डिस्चार्ज देण्यात आले. जिल्ह्यात संक्रमणमुक्त नागरिकांची संख्या ४९,२०९ झालेली आहे, ही ९२.३० टक्केवारी आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३,३७९ आहे. यात १,१६५ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. याशिवाय उर्वरित रुग्ण ‘होम आयसोलेशन’मध्ये आहेत.
बॉक्स
( कृपया तीन ओळी जागा सोडावी)