मेळघाटात कोरोना ब्लास्ट - या बातमीचा जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:12 AM2021-04-14T04:12:01+5:302021-04-14T04:12:01+5:30
लॉकडाऊनची पाहणी करण्यासाठी तहसीलदार उतरले रस्त्यावरशासनाने सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना विक्रीची परवानगी काही अटी ...
लॉकडाऊनची पाहणी करण्यासाठी तहसीलदार उतरले रस्त्यावरशासनाने सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना विक्रीची परवानगी काही अटी व शर्तीवर दिली आहे. मात्र, इतर दुकानेही खुली असल्याची तक्रार प्राप्त झाल्यामुळे तहसीलदार अतुल पाटोळे यांच्यासमवेत निवासी नायब तहसीलदार आदिनाथ गांजरे, नायब तहसीलदार (संजय गांधी योजना) अनिल नाडेकर, पोलीस उपनिरीक्षक करुणा मोरे, नगरपंचायतीचे अधिकारी संतोष खाडे, आमीन शेख यांच्यासह त्यांचे कर्मचारी दुकानांची पाहणी करण्यासाठी सोमवारी दुपारी ५ वाजता मुख्य मार्गाला आले. आदेश नसलेल्या दुकानदारांनाविरुद्ध कारवाईच्या सूचना तहसीलदार अतुल पाटोळे यांनी नगरपंचायत कर्मचाऱ्यांना दिल्या. त्यानुसार, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक, कापड, कटलरी विक्रीच्या आठ दुकानांना नोटीस देण्यात आली. नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन तहसीलदारांनी केले.