कोरोनाचा कहर, ९६५ नवे बाधित, २३ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:12 AM2021-05-01T04:12:36+5:302021-05-01T04:12:36+5:30
अमरावती : कोरोना संसर्गाचा कहर कायम आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट ...
अमरावती : कोरोना संसर्गाचा कहर कायम आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळांच्या अहवालानुसार जिल्ह्यात शुक्रवारी ९६५ संक्रमित रुग्ण आढळून आले. तसेच उपचारादरम्यान २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ६५ हजार ७१७ एवढी झाली आहे.
जिल्ह्यातील २१, तर इतर जिल्ह्यातील दोन असे २३ रुग्ण उपचारादरम्यान दगावले. यात जिल्ह्यातील तिवसा येथील ६२ वर्षीय महिला, परतवाडा कांडली येथील ६५ वर्षीय पुरुष, मोर्शी येथील ६५ वर्षीय महिला, धामणगाव रेल्वे येथील ५० वर्षीय पुरुष, अंजनगाव सुर्जी काकडा येथील ६० वर्षीय पुरुष, अंजनगाव सुर्जी हिरापूर येथील ७० वर्षीय पुरूष, केशव काॅलनी येथील ४२ वर्षीय महिला, शामनगर येथील ५० वर्षीय पुरुष, परतवाडा येथील ५२ वर्षीय पुरुष, चिखलदरा येथील ६० वर्षीय पुरुष, मोर्शी ताज कॉलनी येथील ४५ वर्षीय महिला, वरुड येथील ५८ वर्षीय पुरुष व ६५ वर्षीय पुरुष, तिवसा येथील ६० वर्षीय पुरुष, शेंदूरजनाघाट येथील ८० वर्षीय महिला, वरूड सावंगी येथील ३५ वर्षीय पुरुष, महावीर नगर येथील ६५ वर्षीय महिला, वरूड बेनोडा येथील ७२ वर्षीय पुरुष, चांदर बाजार घाटलाडकी येथील ६० वर्षीय पुरुष, फ्रेजरपुरा येथील ५१ वर्षीय पुरुष, तर जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव येथील २९ वर्षीय पुरुष, नागपूर येथील ४४ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शुक्रवारी ६५० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गृहविलगिकरणात महापालिका क्षेत्रात १,३०२ तर ग्रामीण भागात ४५०५ रुग्ण उपाचर घेत आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण ७,६४० असून, रिकव्हरी रेट ८६.९३ टक्के, डब्लिंग रेट ११४, डेथ रेट १.४६ टक्के आहे. आतापर्यंत ४ लाख २१ हजार ३११ नमुने चाचणी करण्यात आली. मार्च, एप्रिल या दोन महिन्यात कोरोना संक्रमण आणि मृत्यूने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी जाहीर करण्यात आली. मात्र, कोरोना कमी होण्याचे नाव घेत नाही.