अमरावती जिल्ह्यातील अचलपुरात कोरोना मृत्यूचे आकडे संशयास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 01:41 PM2021-02-20T13:41:55+5:302021-02-20T13:42:19+5:30
Amravati News अचलपूर तालुक्यात दहा दिवसांत ३०० हून अधिक कोरोनाग्रस्त नोंदले गेले आहेत. पैकी २०० रुग्ण परतवाडा, अचलपूर शहरातील असून, उर्वरित ग्रामीण भागातील आहेत. यात एक ते चार वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींचाही समावेश आहे.
अनिल कडू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: अचलपूर तालुक्यात दहा दिवसांत ३०० हून अधिक कोरोनाग्रस्त नोंदले गेले आहेत. पैकी २०० रुग्ण परतवाडा, अचलपूर शहरातील असून, उर्वरित ग्रामीण भागातील आहेत. यात एक ते चार वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींचाही समावेश आहे. तालुका महसूल व आरोग्य प्रशासनाची ही आकडेवारी असली तरी याहून तीनपट रुग्ण तालुक्यात आहेत. प्रशासनात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूची संख्या संशयास्पद आहे.
ग्रामीण भागात केवळ तिघांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची माहिती आरोग्य तथा महसूल यंत्रणेकडे आहे. अचलपूर व परतवाडा शहरातील मृत्यूची आकडेवारी संबंधित यंत्रणेकडे उपलब्ध नाही. यादरम्यान दहाहून अधिक कोरोना रुगांच्या मृत्यूची माहिती आहे. अनेक लोक कोरोना लपवत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची माहिती प्रशासनास देण्यात टाळाटाळ केली जात आहे.
शहरासह ग्रामीण भागात वाढती कोरोना संख्या असली तरी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष चालविले आहे. निजंर्तुकीकरण केले जात नाही. सर्वत्र स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. रुग्णालयात किंवा कोरोना केंद्रावर दाखल रुग्णांना बेचव जेवण दिले जात आहे. चहा, नाष्टा आणि जेवणाच्या वेळा संबंधित यंत्रणेकडून पाळल्या जात नाहीत. तालुक्यात मास्क लावणा?्यांचे प्रमाण आजही नगण्य आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा सर्वत्र फज्जा उडत असून, गर्दीकडे दुर्लक्ष आहे. दुकानासमोरील, बाजारपेठेतील ते गोल, चौकोन आज गायब झाले आहेत. प्रशासन थेट नागरिकांनाच दोष देत आहे. यात कोरोनाची नियमावली पायदळी तुडविली जात आहे.