कोरोनाने शनिवारी २१ मृत्यू, ७७२ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:12 AM2021-05-23T04:12:38+5:302021-05-23T04:12:38+5:30
अमरावती : जिल्ह्यात शनिवारी उपचारादरम्यान २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १,३५८ वर पोहोचली आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यांतील ...
अमरावती : जिल्ह्यात शनिवारी उपचारादरम्यान २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १,३५८ वर पोहोचली आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यांतील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी पुन्हा ७७२ ॲक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या ८७,८४३ झाली आहे.
जिल्ह्यात शनिवारी ५,१२६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १५.०६ पाॅझिटिव्हिटीची नोंद झाली आहे. दोन महिन्यांत पहिल्यांदा पॉझिटिव्हिटी घटल्याने दिलासा मिळाला. याशिवाय शनिवारी १,०९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे संक्रमणमुक्त नागरिकांची संख्या आता ७७,३९७ वर पोहोचली आहे. जिल्ह्याचा डबलिंग रेट आता ८८.११ दिवसांवर पोहोचला तसेच मृत्यूचे प्रमाण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत १.५५ टक्के असल्याचा जिल्हा शल्य विभागाचा अहवाल आहे.
बॉक्स
२४ तासांतील मृत्यू
उपचारादरम्यान ५० वर्षीय पुरुष (चिंचखेडा), ७० वर्षीय महिला (तळेगाव), ५५ वर्षीय पुरुष (नांदगाव खंडेश्वर), ५० वर्षीय पुरुष (लेहगाव), ७० वर्षीय महिला (खल्लार), २३ वर्षीय महिला (अखावनगर), ५५ वर्षीय पुरुष (संकेत कॉलनी, अमरावती), ६२ वर्षीय पुरुष (दर्यापूर), ७४ वर्षीय पुरुष (पुसला), ८५ वर्षीय पुरुष (टेलिकॉम कॉलनी, अमरावती), ६३ वर्षीय पुरुष (वरूड), ६७ वर्षीय पुरुष (चिंचोली), ४७ वर्षीय पुरुष (चांदूर रेल्वे), ७४ वर्षीय पुरुष (वलगाव), ७२ वर्षीय पुरुष (आसेगाव पूर्णा), ४६, महिला (शिवणी खुर्द), ५५ वर्षीय महिला (गौरखेडा), ५० वर्षीय पुरुष (वरूड), ७० वर्षीय महिला (परतवाडा), ७२ वर्षीय पुरुष (संजय गांधीनगर, अमरावती) व अन्य जिल्ह्यांतील ७१ वर्षीय महिला आर्वी या रुग्णांचा मृत्यू झाला.