कोरोनाचा इफेक्ट, ‘ट्रॉन्सक्रिप्ट’ची मागणी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:13 AM2021-03-19T04:13:14+5:302021-03-19T04:13:14+5:30

(कॉमन) अमरावती : हल्ली कोरोना संसर्गाचा वेग जोरात आहे. त्यामुळे परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या घटली असून, जानेवारी महिन्याच्या ...

Corona effect, demand for 'transcript' decreased | कोरोनाचा इफेक्ट, ‘ट्रॉन्सक्रिप्ट’ची मागणी घटली

कोरोनाचा इफेक्ट, ‘ट्रॉन्सक्रिप्ट’ची मागणी घटली

Next

(कॉमन)

अमरावती : हल्ली कोरोना संसर्गाचा वेग जोरात आहे. त्यामुळे परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या घटली असून, जानेवारी महिन्याच्या तुलनेत मार्चमध्ये अर्जाची संख्या निम्म्यावर आली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ‘ट्रॉन्सक्रिप्ट’साठी १८ मार्चपर्यंत केवळ २० अर्ज प्राप्त झाले आहेत.

अमरावती विद्यापीठांतर्गत विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी कॅनडा देशाला पसंती असते. उच्च शिक्षण आणि स्थायी नागरिकत्वासाठी ‘ट्रॉन्सक्रिप्ट’ अनिवार्य असते. त्याअनुषंगाने १ ते १८ मार्च यादरम्यान २० अर्ज प्राप्त झाले आहे.

परदेशात उच्च शिक्षण अथवा पारपत्रासाठी (व्हिसा) ‘ट्रॉन्सक्रिप्ट’ अनिवार्य आहे. ‘लॉकडाऊन’मुळे महाविद्यालये बंद आहे. त्यामुळे जानेवारीत ७२, फेब्रुवारीत ४२ ‘ट्रॉन्सक्रिप्ट’साठी अर्ज प्राप्त झालेत. मात्र, जुलै २०२० ते १४ जानेवारी २०२१ या काळात ‘ट्रॉन्सक्रिप्ट’साठी अर्ज़ वाढले. प्रथम कॅनडा आणि नंतर अमेरिका या देशासाठी अर्ज करण्यात आले आहे. अभियांत्रिकीची बी.ई. पदवी मिळविणारे बहुतांश विद्यार्थी कॅनडा येथे मास्टर ऑफ स्टडीज एमई उच्च शिक्षणासाठी जात आहेत. कॅनडा येथील आयक्यूएएस, आयसीएएस, डब्ल्यूईएस तर अमेरिकेच्या वर्ल्ड एज्युकेशन सर्व्हिसेस (डब्लूईएस) साठी ‘ट्रॉन्सक्रिप्ट’ची मागणी वाढली आहे. सन २०१९ मध्ये ७५९ आणि सन २०२० मध्ये ४६० ’ट्रॉन्सक्रिप्ट’ परदेशात पाठविण्यात आल्या आहेत. यंदा १ जानेवारी ते १८ मार्च २०२१ या दरम्यान १४४ अर्ज प्राप्त झाले आहे. मात्र, मार्च महिन्यात ‘ट्रॉन्सक्रिप्ट’ची मागणी घटली आहे.

--------------------

ई-मेलवर पाठविली जाते ‘ट्रॉन्सक्रिप्ट’

अमरावती विद्यापीठातून परदेशात ‘ट्रॉन्सक्रिप्ट’ ई-मेलवर पाठविले जाते. कोरोना काळापासून ही सुविधा उपलब्ध झाली आहे. कागदपत्रे दिल्यानंतर दोन ते तीन दिवसात ई-मेलवर हे प्रमाणपत्र पाठविले जाते. तसेच ‘ट्रॉन्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र बंद लिफाफ्यातही दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, खर्च वाचत आहे.

---------------------

मार्चमध्ये परदेशात ‘ट्रॉन्सक्रिप्ट’ची मागणी घटली आहे. बंद लिफाफ्यासह ई-मेलवरही हे प्रमाणपत्र पाठविले जाते. कोरोनामुळे ही स्थिती आल्याचे दिसून येते.

- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ

Web Title: Corona effect, demand for 'transcript' decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.