कोरोनाचा उद्रेक, उच्चांकी २६ मृत्यू, ५९३ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:13 AM2021-04-20T04:13:52+5:302021-04-20T04:13:52+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गात मृत्यूचा ग्राफ वाढता आहे. यामध्ये सोमवारी पुन्हा २६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गात मृत्यूचा ग्राफ वाढता आहे. यामध्ये सोमवारी पुन्हा २६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये जिल्ह्यात पहिल्यांदा १६ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या ७९३वर झालेली आहे. याशिवाय १० बाधित मृत हे नागपूर, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातले आहेत. जिल्ह्यात सोमवारी पुन्हा ५९३ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संक्रमितांची संख्या ५७,१६५ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात सोमवारी ५,५४२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये १०.७० अशी पॉझिटिव्हिटी नोंद झालेली आहे. चार दिवसांमध्ये चाचण्या वाढल्यानंतर रुग्णसंख्या वाढत असली तरी यामध्ये पॉझिटिव्हिटी कमी होत असल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात फेब्रुवारीनंतर पुन्हा एप्रिल महिन्यात संसर्ग वाढायला सुरुवात झाली असली तरी आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
जिल्हा सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना सध्या ब्लास्ट होत असल्याने तेथील रुग्णालयांमध्ये बेडची संख्या अपुरी पडत असल्याने कित्येक रुग्ण अमरावती जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामुळे येथील खासगी रुग्णालयात बेडचा तुटवडा पडत असल्याचे चित्र आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास जिल्ह्यात जम्बो रुग्णालय सुरु करण्याची वेळ येईल, अशी स्थिती उद्भवणार असल्याचे एका डॉक्टरांनी सांगितले.
बॉक्स
जिल्ह्यात २४ तासांतील बाधितांचे मृत्यू
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या माहितीनुसार येथील ७२ वर्षीय पुरुष (शारदा नगर), ४५ वर्षीय पुरूष (भीम नगर), ४२ वर्षीय पुरुष (मसानगंज) तसेच ३० वर्षीय पुरुष (वरुड), ६२ वर्षीय महिला (वलगाव), ५० वर्षीय पुरुष (धामणगाव काटपूर), ९० वर्षीय पुरुष (आरेगाव), ७८ वर्षीय पुरुष (कारंजा घाडगे), ७५ वर्षीय महिला (काटोल), ३४ वर्षीय पुरुष (कविठा कडू), ५० वर्षीय पुरुष (भारवाडी), ६६ वर्षीय पुरुष (तिवसा), ५५ वर्षीय पुरुष (सावरगाव) बुलडाणा, ६५ वर्षीय महिला (वरुड), ६५ वर्षीय पुरूष (खैरगाव) नरखेड व ५५ वर्षीय पुरूष (शिरजगाव कोरडे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
बॉक्स
नागपूर, यवतमाळ, वर्धा येतीळ रुग्णांचा मृत्यू
अन्य जिल्ह्यातील रुग्ण उपचारार्थ येथे दाखल झाले होते. यामध्ये सोमवारी उपचारादरम्यान ३४ वर्षीय महिला (आर्वी), ३० वर्षीय महिला (सावनेर), ३८ वर्षीय पुरुष (नागपूर), ५४ वर्षीय पुरुष (जरीपटका, नागपूर), ६२ वर्षीय महिला (विद्यानगर, यवतमाळ), ५१ वर्षीय पुरुष (गणपतीनगर, नागपूर), ४० वर्षीय महिला (अशोक पार्क, यवतमाळ), ३८ वर्षीय पुरुष (नागपूर), ४५ वर्षीय महिला (नागपूर), ६० वर्षीय पुरुष (चांदेवाडी, वर्धा) या रुग्णांचा मृत्यू झाला.