कोरोना विस्फोट, १३ मृत्यू, ६४९ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:12 AM2021-04-15T04:12:36+5:302021-04-15T04:12:36+5:30
अमरावती : जिल्ह्यात बुधवारी पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला. यात १३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत ७३९ बाधितांचे मृत्यू ...
अमरावती : जिल्ह्यात बुधवारी पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला. यात १३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत ७३९ बाधितांचे मृत्यू झालेले आहेत. याशिवाय ६४९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ५३,९६३ झालेली आहे.
जिल्ह्यातील कोरोना संसर्गात आता मृतांची वाढती संख्या आहे. याशिवाय चाचण्यांमधील पॉझिटिव्हिटी सातत्याने वाढली आहे. बुधवारी २,८८१ चाचण्या करण्यात आल्या. यात २२.५२ टक्के पॉझिटिव्हिटीची नोंद झालेली आहे. गत आठवड्यात ७ टक्क्यांवर पॉझिटिव्हिटी आली होती, ती आता वाढली आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात कोरोनाचा नवा स्ट्रेनमुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला होता. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात आठ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरपासून संर्सगात कमी आलेली होती. मात्र, त्यानंतर होळी व रंगपंचमीत कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन झाले नाही. याशिवाय जिल्ह्यात लगतच्या जिल्ह्यातील व प्रामुख्याने नागपुरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारार्थ दाखल आहेत. त्यांचे नातेवाईकही जिल्ह्यात दाखल आहे. त्यामुळेही संसर्ग वाढत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यावेळी शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.
पाईंटर
अशी वाढली चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटी
दिनांक चाचण्या पॉझिटिव्हिटी
८ एप्रिल ३८७४ ०९.७५
९ एप्रिल ३६४६ १२.३३
१० एप्रिल ३४८४ ११.४२
११ एप्रिल ३१६४ १४.३८
१२ एप्रिल २३१५ १७.८८
१३ एप्रिल २६४१ १९.७६
१४ एप्रिल २८८१ २२.५२
बॉक्स
२४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू
( कृपया चार ओळी जागा सोडणे)