कोरोना होऊन गेला, इतर आजाराच्या शस्त्रक्रिया करायची कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:11 AM2021-09-13T04:11:39+5:302021-09-13T04:11:39+5:30
बॉक्स इमर्जंसी शस्त्रक्रिया काही लोक शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांकडे हट्ट धरतात. परंतु, असे करणे आरोग्यासाठी लाभदायक कमी आणि धोकादायक अधिक ठरू ...
बॉक्स
इमर्जंसी शस्त्रक्रिया
काही लोक शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांकडे हट्ट धरतात. परंतु, असे करणे आरोग्यासाठी लाभदायक कमी आणि धोकादायक अधिक ठरू शकते. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचना व रुग्णाची परिस्थिती पाहूनच शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा लागतो. मुद्दाम कुणी टाळाटाळ करीत असेल तर त्याची रीतसर तक्रार सीएसकडे करता येईल. त्यामुळे नागरिकांनी याबाबत जागरूक असणे गरजेचे आहे.
--
दीड महिना वाट पहा
कोरोना झालेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेदरम्यान दिली जाणारी भूल पडण्याची सुई सहन करण्याची क्षमती कमी असते. त्यामुळे रुग्णाची स्थिती बरी नसल्यास कोरोनामुक्तीनंतर दीड महिन्यांचा कालावधी जाणे आवश्यक आहे. त्यानंतर शरीर प्रतिसाद देत असल्याची खात्री पटल्यानंतरच शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.
--
प्लान शस्त्रक्रिया
शस्त्रक्रियेबाबत योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कोरोना झालेल्या रुग्ण हायडोज औषधीमुळे अशक्त होतात. त्यानंतर अन्य आजारासंबंधित शस्त्रक्रिया केल्यास त्याला वेळोवेळी औषधी द्यावी लागते. त्याची नियिमत तपासणी करणे आवश्यक असते, असे डॉ. निकम यांनी सांगितले.
कोट
कोरोनामुक्तीनंतर दोन आठवड्यांनी अत्यावश्यक असलेल्या व्यक्तींची शारीरिक क्षमता आणि तंदुरुस्ती बघून शस्त्रक्रिया करता येईल. अन्यथा शस्त्रक्रियेसाठी घाई करू नये. मनातील गैरसमज दूर करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार घ्यावा.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक
पॉइंटर
कोरोनाचे एकूण रुग्ण -
बरे झाले रुग्ण - ९६०९५
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - ९४४७७
कोरोनाचे बळी - १५६३