कोरोनाने नऊ मृत्यू, ५४२ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:14 AM2021-05-25T04:14:09+5:302021-05-25T04:14:09+5:30
अमरावती : जिल्ह्यात सोमवारी नऊ संक्रमितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाग्रस्तांची मृत्युसंख्या १,३८२ झाली आहे. याशिवाय ५४२ पॉझिटिव्हची नोंद झाली. कोरोनाने ...
अमरावती : जिल्ह्यात सोमवारी नऊ संक्रमितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाग्रस्तांची मृत्युसंख्या १,३८२ झाली आहे. याशिवाय ५४२ पॉझिटिव्हची नोंद झाली. कोरोनाने आतापर्यंत ८९,०२२ व्यक्ती संक्रमित झाल्या आहेत.
जिल्ह्यात तीन महिन्यात पहिल्यांदा ११ टक्क्यांपर्यत पॉझिटिव्हिटीची रविवारी नोंद झाली. मात्र, दुसऱ्या दिवशी ३,५२५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १५.३४ टक्के पॉझिटिव्हिटीची नोंद झाली आहे. सोमवारी ९२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ७९,४६३ नागरिक संक्रमणमुक्त झाले आहेत. ही टक्केवारी ८९.२६ असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
बॉक्स
२४ तासांतील कोरोना मृत्यू
सोमवारी उपचारादरम्यान ४३ वर्षीय महिला (वलगाव), ६० वर्षीय पुरुष (अचलपूर), ५५ वर्षीय पुरुष (अंबाडा), ६० वर्षीय महिला (आसेगाव पूर्णा), ५० वर्षीय महिला (अमरावती), ७५ वर्षीय महिला (भांबोरा), ७५ वर्षीय महिला (वरूड), ८५ वर्षीय महिला (सोनगाव), ५५ वर्षीय पुरुष (कबीरनगर) या नऊ रुग्णांचा मृत्यू झाला.