कोरोना, उच्चांकी १,२४१ संक्रमित, २१ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:13 AM2021-05-09T04:13:38+5:302021-05-09T04:13:38+5:30
अमरावती : जिल्ह्यात रोज नव्या पॉझिटिव्हचा उच्चांक वाढत आहे. शनिवारी आतापर्यंतच्या सर्वात जास्त १,२४१ संक्रमितांची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची ...
अमरावती : जिल्ह्यात रोज नव्या पॉझिटिव्हचा उच्चांक वाढत आहे. शनिवारी आतापर्यंतच्या सर्वात जास्त १,२४१ संक्रमितांची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ७४,२४९ झाली आहे. याशिवाय १९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १,०९९ झालेली आहे. याशिवाय एमपी व चंद्रपूरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग धडकी भरविणारा आहे. शनिवारची १,२४१ रुग्णसंख्या आतापर्यंतचा उच्चांक आहे. मे महिन्यात जिल्हा ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या सर्वाधिक वाढली होती. शनिवारी महापालिका क्षेत्रातही रुग्णसंख्या आठ दिवसांच्या तुलनेत वाढलेली दिसून आली. मे महिन्यात आठ दिवसांत ७,५५२ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. याशिवाय १३३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.
जिल्हा चिकित्सक कार्यालयाच्या माहितीनुसार, शनिवारी ५,२८० नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता यामध्ये २३.५० टक्के पॉझिटिव्हिटी नोंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १०,२३७ वर पोहोचली आहे. यात २,१७९ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहे. याशिवाय महापालिका क्षेत्रात २,४०६ व ग्रामीणमध्ये ५,६५२ रुग्ण होम आयसोलेटेड आहेत. शनिवारी उपचारादरम्यान बरे वाटल्याने उच्चांकी ९४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे संक्रमणमुक्त नागरिकांची संख्या ६२,९१३ झालेली आहे. ही टक्केेवारी ८४.७३ इतकी आहे.
बॉक्स
२४ तासांत २१ मृत्यूची नोंद
(कृपया सहा ओळी जागा सोडावी)