५० हजारांवर रुग्ण कोरोना संक्रमणमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:12 AM2021-04-18T04:12:36+5:302021-04-18T04:12:36+5:30
अमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत ५५,१५७ कोरोनाग्रस्त असले तरी उपचारानंतर ५०,३५३ रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. ...
अमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत ५५,१५७ कोरोनाग्रस्त असले तरी उपचारानंतर ५०,३५३ रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. ही टक्केवारी ९० टक्के असल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात पहिल्या रुग्णांची नोंद ४ एप्रिलला झाल्यानंतर एप्रिल महिन्यात पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला होता. सुरुवातीच्या काळात रुग्ण दाखल झाल्यानंतरच्या १५ दिवसांनंतर त्या रुग्णांच्या सलग दोन चाचण्या झाल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज दिला जात होता. पहिल्या पाच रुग्णांचे डिस्चार्जदरम्यान जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांसह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी त्यांच्या स्वागताला उपस्थित होते. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले होते. त्यानंतर मात्र, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत गेला व आता रुग्णसंख्या ही ५५ हजारांवर पोहोचली आहे.
डिस्चार्ज देण्यात आला असला तरी रुग्णांनी किमान एक आठवडा घरात क्वारंटाईन राहणे महत्त्वाचे आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेद्वारा रुग्णांकडून लेखी हमीपत्र घेण्यात येत आहेत. आता असिम्टोमॅटिक व सौम्य लक्षणाच्या रुग्णांसाठी डेडिकेटेड कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी रुग्णांना सध्या ठेवण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाचे सांगितले.
बॉक्स
आता सहा दिवसांनीच डिस्चार्ज
जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात १७ दिवसांनी डिस्चार्ज दिल्या जायचा. त्यानंतर रुग्णसंख्या वाढू लागल्याने आयसीएमआरच्या गाईडलाईननुसार १० दिवसांनी दिल्या जात असे. या सहा महिन्यांत तर सहाव्या किंवा सातव्या दिवसी डिस्चार्ज दिला आहे. यानंतर रुग्णांना किमान सात दिवस होम क्वारंटाईन राहावे लागत आहे.
पाईंटर
दिनांक संक्रमणमुक्त
०१ जानेवारी : १९,०२१
१५ जानेवारी : १९,८५६
०१फेब्रुवारी : २१,२१७
१५ फेब्रुवारी : २४,०९०
०१ मार्च : २९,८४८
१५ मार्च : ३७,७६८
०१ एप्रिल : ४४,९१३
१७ एप्रिल : ५०,३५३