कोरोना संक्रमण घटले, मृत्यू वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:11 AM2021-05-29T04:11:03+5:302021-05-29T04:11:03+5:30

अमरावती : जिल्ह्यात आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. ही स्थिती लोकांसाठी दिलासादायक ठरणारी असली तरी कोरोनाने ...

Corona infections decreased, deaths increased | कोरोना संक्रमण घटले, मृत्यू वाढले

कोरोना संक्रमण घटले, मृत्यू वाढले

Next

अमरावती : जिल्ह्यात आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. ही स्थिती लोकांसाठी दिलासादायक ठरणारी असली तरी कोरोनाने मृत्यूचे प्रमाण अलीकडे वाढले आहे.

१५ दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचे १२,५७८ रुग्ण आढळले, तर २५६ रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, आठवडाभराचा विचार केला तर सात दिवसांत ४,७७६ रुग्ण आढळले, ९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गत आठवड्यात ही रुग्णसंख्या तब्बल ३,०२४ ने कमी झालेली आहे, तर मृत्यूदेखील ५८ कमी झालेले आहे. मात्र, मे महिन्यात कोरोनाने बळी जाणाऱ्यांची संख्या वाढतीवरच आहे. जिल्ह्यात तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात लहान बालकांसाठी ६० बेडचे एक रुग्णालय उभारण्यात येणार असून, यासोबतच जिल्ह्यात खासगी तीन बाल रुग्णालयाला कोविड उपचारासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आता रुग्णालयातील रुग्णांची संख्यादेखील कमी होत आहे. एकेकाळी रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले होते. आता मात्र खासगी व शासकीय रुग्णालयांतही अनेक बेड रिकामे आहेत. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू असून, इतर सर्व बाजारपेठा मात्र बंद असल्याने व्यापाऱ्यांचे तसेच मजुरांचे हाल होत आहे. १ जूननंतर पुन्हा लॉकडाऊन लागल्यास व्यापारी व मजूर वर्गाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

--------------

आता जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. पुढच्या आठवड्यात आणखी रुग्ण कमी होतील, अशी आशा आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक सोईसुविधा उपलब्ध आहे.

- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

---------------------

बॉक्स

- जिल्ह्यात १५ दिवसांतील कोरोना रुग्णांची संख्या - १२,५७०

- १५ दिवसांतील कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू - २५६

- गत आठवड्यातील एकूण रुग्णसंख्या- ४,७७६

- गत आठवड्यातील मृत्यू - ९९

शहरात एकूण रुग्णालये - ४८

कोविड केअर सेंटर- १५

एकूण बेड रुग्ण रिक्त बेड

आयसीयू ५१९ ३३० १८९

ऑक्सिजन ६८५ ३४८ ३३७

सामान्य ५२६ १२५ ४०१

कोविड केअर सेंटर

एकूण बेड - १३१५

रिक्त बेड - ९६९

कोविड हॉस्पिटल

एकूण बेड - २५१५

रिक्त बेड - १३४७

----------------------

ग्राफिक्स

मागील २६ दिवसांपासून कोरोना रुग्ण व मृत्यू

महिना रुग्ण. मृत्यू

१ मे ९८० १२

२ मे ८०४ १९

३ मे ९०३ २१

४ मे ११२३ २५

५ मे ११६७ २७

६ मे ११८९ २४

७ मे ११२५ १३

८ मे १२४१ २१

९ मे ११८६ २७

१० मे १००५ १८

११ मे १०१६ १७

१२ मे १०९२ २०

१३ मे ११८८ २४

१४ मे ९२२ २०

१५ मे १०९७ २१

१६ मे ११७५ १८

१७ मे ८७० २०

१८ मे ७९८ २१

१९ मे ७०१ १३

२० मे ८७९ १९

२१ मे ८९३ १७

२२ मे ७७२ २१

२३ मे ६३७ १६

२४ मे ५४२ ९

25 मे. ५२५ ८

२६ मे ५२८ ९

Web Title: Corona infections decreased, deaths increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.