धामणगावात १५९ शेतकऱ्यांची कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:10 AM2021-06-03T04:10:37+5:302021-06-03T04:10:37+5:30

एसबीआय कृषी शाखेचा उपक्रम, धामणगाव रेल्वे : खरिपाच्या हंगामाला काही दिवस शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी कर्जासाठी बँकांच्या येरझारा ...

Corona inspection of 159 farmers in Dhamangaon | धामणगावात १५९ शेतकऱ्यांची कोरोना तपासणी

धामणगावात १५९ शेतकऱ्यांची कोरोना तपासणी

Next

एसबीआय कृषी शाखेचा उपक्रम,

धामणगाव रेल्वे : खरिपाच्या हंगामाला काही दिवस शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी कर्जासाठी बँकांच्या येरझारा वाढल्या आहेत. त्यामधून कोरोना आजाराचे प्रमाण वाढू नये व शेतकऱ्यांना वेळीच कोरोनाचा उपचार घेता यावा, यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या कृषी शाखेत १५९ शेतकऱ्यांची कोरोना चाचणी मंगळवारी करण्यात आली.

शाखा व्यवस्थापक विनायक कुराडे यांनी भारतीय स्टेट बँकेच्या आवारातच ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने कोरोना तपासणी शिबिर आयोजित केले. प्रथम बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चाचणी करून घेतली. यानंतर बँकेत आलेले सर्व ग्राहक व शेतकऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेश साबळे, आरोग्यमित्र राजेंद्र जगताप, बँकेचे कर्मचारी अर्पित

राक्षसकर, मुरलीधर कडू, राजेंद्र धनस्कर, राजू शहा, सीमा काटकर, रोशनी शाहू, पुंडलिक कुमरे, संजय दहातोंडे, महेश नक्षणे यांनी अथक परिश्रम घेतले.

फोटो- बँक परिसरात शेतकरी स्वतः हून कोरोना चाचणी करून घेताना.

Web Title: Corona inspection of 159 farmers in Dhamangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.