अमरावतीत कोरोनाने पुन्हा १० जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 11:15 AM2020-09-05T11:15:51+5:302020-09-05T11:17:31+5:30
अमरावती जिल्ह्यात २४ तासांत दहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात २४ तासांत दहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले. यामध्ये गुरुवारी तीन व शुक्रवारी सात रुग्णांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १४७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्त्यांच्या मृत्यूचे प्रमाण २.२५ टक्के आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालानुसार गुरुवारी परतवाड्यातील ७० वर्षीय महिला, अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथील ७० वर्षीय महिला, अचलपूर तालुक्यातील कविठा बुजरुक येथील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. शुक्रवारच्या अहवालानूसार क्रिष्णा नगरात ६५ वर्षीय पुरुष, किशोरनगरात ६१ वर्षीय महिला, छाबडा प्लॉट येथील ६२ वर्षीय पुरुष, आर्वी येथील ६४ वर्षीय पुरुष, कर्नल कॉलनीतील ६८ वर्षीय पुरुष, स्वावलंबीनगरातील ६२ वर्षीय पुरुष तसेच चांदूर बाजार येथील ६५ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
पहिल्या आठवड्यातपर्यत कोरोना संकमितांच्या मृत्यूची कारणमिमांसा करण्यात आली. यामध्ये ८० टक्कयांवर मृत्यूमध्ये कोरोनासह इतरही आजार कारणीभूत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आलेले आहे तसेच मृतांमध्ये वयोवृद्धांची संख्या अधिक असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
कोरोनाची जिल्हास्थिती
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालानुसार आतापर्यत ६०,३०४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ५०,०९१ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.त्यापैकी ४२,३०६ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहे. आतापर्यत ६५०९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहे. अद्याप १०३६ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात उपचारानंतर बरे वाटल्याने ४९४२ व्यक्तींना घरी सोडण्यात आल्याने जिल्ह्यात अ?ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १४२० आहे.