कोरोनामुळे उघडले डोळे; शहरात वाढली रुग्णालये, सुविधाही वाढल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:11 AM2021-07-01T04:11:18+5:302021-07-01T04:11:18+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ माघारत असला तरी दुसऱ्या लाटेने जिल्हा व आरोग्य यंत्रणेच्या तोंडचे पाणी पळविले होते. या ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ माघारत असला तरी दुसऱ्या लाटेने जिल्हा व आरोग्य यंत्रणेच्या तोंडचे पाणी पळविले होते. या निमित्ताने जिल्ह्यातील आरोग्य सुविधेत मात्र, चांगलीच भर पडली आहे. याचा भविष्यात सर्वांनाच लाभ होणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ४ एप्रिलला निष्पन्न झाला. त्यानंतर कोरोना संसर्गाचा ग्राफ वाढीस लागला. पहिला रुग्ण ४ एप्रिल रोजी नोंद झाल्यानंतर संसर्ग वाढायला लागला. पहिली लाट ऑगस्ट ते सप्टेंबर २०२० पर्यंत राहिली. दरम्यान जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या उपचाराबाबत सुविधा वाढविण्यात आल्या. त्यानंतर दुसऱ्या लाटेचे नियोजन करताना डिसेंबरपासून प्रत्येक सुविधेत वाढ करण्यात आली आहे. कोरोनात्या गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड, आसीयू, व व्हेंटिलेटर महत्त्वाचे आहे.
जिल्ह्यात शासकीय व खासगी अशा दोन्ही प्रकारातील रुग्णालयात सद्यस्थितीत १,१५० ऑक्सिजन बेडची सुविधा आहे. याशिवाय जिल्हा कोविड रुग्णालय, डाॅ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व दयासागर रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती होत असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
बॉक्स
मार्चपासून वाढले ग्रामीण भागात रुग्ण
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे वर्षभरात महापालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्तांची नोंद जास्त होती. मात्र, मार्च २०२१ नंतर शहरात संक्रमितांची संख्या माघारली व ग्रामीणमध्ये वाढली. यात अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, मोर्शी, वरूड, धारणी आदी तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट बनले. या तालुकालगतच्या अन्य जिल्ह्यात कोरोनाचा ब्लास्ट झाला व कोरोनाच्या नव्या मुटेशनचा जिल्ह्यात शिरकाव झाला. याशिवाय जिल्हा सीमेलगतच्या मध्यप्रदेशातूनही उपचारार्थ रुग्ण जिल्ह्यात आल्यानेही जिल्ह्यातील संसर्ग वाढल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
वरूड तालुक्यात सर्वाधिक ८,१८२ रुग्ण
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९५,९८४ आहेत. यात ग्रामीणमध्ये ५१,२५० संक्रमितांची नोंद झालेली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या माहितीनुसार अमरावती तालुक्यात २,६८०, भातकुली १,७०३, मोर्शी ४,३८३, अंजनगाव सुर्जी ४,११५, अचलपूर ७,७५२, चांदूर रेल्वे २,७०४, चांदूर बाजार ३६४८, चिखलदरा १,७७३, धारणी २,५१९, दर्यापूर ३,०२६, धामणगाव रेल्वे ३,०८२१, तिवसा ३,१९२ व नांदगाव खंडेश्वर २,५०० रुग्णांची नोंद आाहे.
कोट
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा तयार करण्यात आल्या. आता संसर्ग जरी कमी झाला तरी भविष्यात त्या कामात येणार आहे. यात ऑक्सिजन बेड, प्लांट, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, मुलांसठी बेड, टेस्टिंग वाढविण्यात आलेल्या आहेत. याशिवाय लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे.
- शैलेश नवाल,
जिल्हाधिकारी
पाईटर
कोरोना आधी व नंतर
सरकारी रुग्णालये कोविड सेंटर
१५ १७
खासगी रुग्णालये, कोविड सेंटर
१९ ४७
ऑक्सिजन निर्मिती प्लांट
२ १६
आयसीयू बेडची संख्या
१८० ४६६
व्हेंटिलेटर
३५