कोरोनाचा उद्रेक, ३२ मृत्यू, उच्चांकी ९४६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:10 AM2021-04-29T04:10:07+5:302021-04-29T04:10:07+5:30

अमरावती : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचा ब्लास्ट झाला. आतापर्यंतचे सर्वाधिक ३२ मृत्यू आणि उच्चांकी ९४६ कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने हादरा ...

Corona outbreak, 32 deaths, high 946 positive | कोरोनाचा उद्रेक, ३२ मृत्यू, उच्चांकी ९४६ पॉझिटिव्ह

कोरोनाचा उद्रेक, ३२ मृत्यू, उच्चांकी ९४६ पॉझिटिव्ह

Next

अमरावती : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचा ब्लास्ट झाला. आतापर्यंतचे सर्वाधिक ३२ मृत्यू आणि उच्चांकी ९४६ कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने हादरा बसला आहे. उपचारादरम्यान जिल्ह्यातील १९ तसेच नागपूर, वर्धा, यवतमाळ व एमपीमधील १३ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात बाधितांच्या मृत्यूची संख्या आता १,०३९ झालेली आहे. याशिवाय ६४ दिवसांनंतर पुन्हा उच्चांकी ९२६ कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ६३,८१८ वर पोहोचली आहे. यापूर्वी २३ फेब्रुवारीला उच्चांकी ९२६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गात रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे. एप्रिलच्या २८ दिवसांत तब्बल ३६२ कोरोनाग्रस्तांचे मृत्यू झाले. याशिवाय याच कालावधीत तब्बल १४,३९५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. ही देखील कोरोना संसर्गाचे एक वर्षे २४ दिवसांच्या संसर्ग कालावधीतील उच्चांक ठरत आहे. त्यामुळे प्रशासनासोबत नागरिकांची जबाबदारी वाढली आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी त्रिसूत्रीचे व संचारबंदीच्या कालावधीतील नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

जिल्ह्यात बुधवारी ६,९७० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १३.५७ पॉझिटिव्हिटी नोंद झालेली आहे. यापूर्वी २३ फेब्रुवारीला ९२६ रुग्णांची नोंद झाली होती. त्यादिवशी २,४७२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. ३७.४५ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद झाली होती. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६,९७० कोरोनाग्रस्त ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक ५,२३५ रुग्णांनी होम आयसोलेशन सुविधा घेतलेली आहे. हे रुग्ण, सौम्य लक्षणांची आहेत. मात्र, सध्या १,७२७ पॉझिटिव्ह रुग्ण विविध कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. जिल्हा सीमेलगतच्या नागपूर, वर्धा, यवतमाळ व मध्यप्रदेशात देखील कोरोनाचा संसर्ग वाढल्याने तेथील कोविड हॉस्पिटलमधील बेड रुग्णांनी व्याप्त झाल्यामुळे या ठिकाणचे तीनशेवर रुग्ण अमरावती जिल्ह्यात उपचारार्थ दाखल आहेत. अशातच जिल्ह्यातील संसर्ग देखील वाढल्याने गंभीर रुग्णांची संख्यादेखील वाढतच आहे. त्यामुळे आयसीयू, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर व रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख कमी करण्यासाठी प्रशासनाला प्रयत्नाला नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.

पाईंटर

महिना पॉझिटिव्ह मृत्यू

जानेवारी २०२१ २२१० २२

फेब्रुवारी २०२१ १३,२३० ९२

मार्च २०२१ १३,५१८ १६४

२८ एप्रिल २०२१ १४,८९५ ३६२

बॉक्स

यंदा ४४,०५० पॉझिटिव्ह, ५१९ मृत्यू

जिल्ह्यात यंदा १ जानेवारीपासून तब्बल ४४,०५० कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे तर याच कालावधीत ५१९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. याच दरम्यान ३६,९१२ रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. यामध्ये एप्रिल महिन्यातील २८ दिवसांत तब्बल १४,८९५ पॉझिटिव्ह व ३६२ रुग्णांचे मृत्यू झालेले आहेत.

बॉक्स

शहरासोबत अचलपूर, वरुड, तिवसा झाले हॉटस्पॉट

जिल्ह्यात २७ एप्रिलपर्यंत अमरावती महापालिका क्षेत्रासह तालुक्यात सर्वाधिक ३६,०५४ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. याशिवाय जिल्हा ग्रामीणमध्ये अचलपूर तालुक्यात ४,०४९, वरूड तालुक्यात ३,४७६, तिवसा १,८७३, अंजनगाव सुर्जी १,७८१ यासोबतच आदिवाशीबहुल दुर्गम भाग असलेल्या धारणी तालुक्यात १,५२० कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहेत. फक्त चिखलदरा व भातकुली तालुकेच एक हजारांचे आत आहे.

बॉक्स

जिल्ह्यात २४ तासांतील मृत्यू

(कृपया पाच ओळी)

बॉक्स

नागपूर, वर्धा, यवतमाळ, एमपीमधील रुग्णांचे जिल्ह्यात मृत्यू

(कृपया पाच ओळी)

Web Title: Corona outbreak, 32 deaths, high 946 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.