जिल्हा परिषदेत पुन्हा कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:22 AM2021-02-06T04:22:29+5:302021-02-06T04:22:29+5:30
सहा जण पॉझिटिव्ह, अधिकाऱ्यासह, कर्मचारी व चालकांचा समावेश अमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषोच्या मुख्यालयात कोरोनाचा ...
सहा जण पॉझिटिव्ह, अधिकाऱ्यासह, कर्मचारी व चालकांचा समावेश
अमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषोच्या मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बाधितांमध्ये एका अधिकारी, कर्मचारी व एका चालकांसह सहा जणांचा समावेश आहे. या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेत गत दोन दिवसांत आढळलेल्या कोरोना संक्रमितांमध्ये एका डेप्युटी सीईओंसह, विस्तार अधिकारी सांख्यािकी, पंचायत, औषध भांडार विभागातील फॉर्मासिट, वाहनचालकासह आरोग्य सभापतींचे स्वीय सहायक अशा ६ जणांचा यात समावेश आहे. सभापतींचे स्वीय सहायक पॉझिटिव्ह आल्याने आरोेग्य सभापतीचे दालन बंद करण्यात आले आहे. दरम्यान जिल्हा परिषदेत कोरोना संक्रमित आढळल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये चितेंचे वातावरण पसरले आहे. वरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. यासोबतच खबरदारीच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचनाही प्रशासनाने केल्या आहेत.
बॉक्स
परिसरात निर्जंतुकीकरण
जिल्हा परिषद सभापतीचे स्वीय सहायक संक्रमित आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पदाधिकाऱ्यांच्या दालनासह डेप्युटी सीईओंचे दालन व अन्य परिसरात प्रशासनाकडून निर्जंतुकीकरण करण्यात आले. शिवाय दालने तुर्तास बंद ठेवण्यात आली आहेत.