कोरोनाने दिला मृत्यूदंड, तरिही जाणुनबुजून ‘कायदेभंग’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:10 AM2021-06-28T04:10:54+5:302021-06-28T04:10:54+5:30

इन डेप्थ स्टोरी प्रदीप भाकरे अमरावती : कोट्यवधी नागरिकांना झालेले कोरोना संक्रमण व पाठोपाठच्या लॉकडाऊनने जसा देश आजाराच्या खाईत ...

Corona sentenced to death, but deliberately 'breaking the law'! | कोरोनाने दिला मृत्यूदंड, तरिही जाणुनबुजून ‘कायदेभंग’ !

कोरोनाने दिला मृत्यूदंड, तरिही जाणुनबुजून ‘कायदेभंग’ !

googlenewsNext

इन डेप्थ स्टोरी

प्रदीप भाकरे

अमरावती : कोट्यवधी नागरिकांना झालेले कोरोना संक्रमण व पाठोपाठच्या लॉकडाऊनने जसा देश आजाराच्या खाईत लोटला गेला. तशी संचारबंदी, जमावबंदी लागू झाली. त्यातच कोरोनाला हद्दपार करण्यासाठी त्रिसुत्री जाहिर करण्यात आली. साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ च्या तरतुदीचा आधार घेत जिल्हाधिकाºयांनी वेळोवेळी आदेश पारित केले. त्यात सर्वाधिक बोलबाला राहिला. तो पोलिसांनी दाखल केलेल्या भादंविच्या कलम १८८ चा. खून, अतिप्रसंग, दरोडा, चोरीच्या गुन्ह्यात ज्या कलमांन्वये गुन्हे दाखल केले जातात, त्या कलमा सामान्यांच्याही अंगवळणी पडल्या. मात्र, १८८ म्हणजे काय, तो दाखल झाल्यावर काय कारवाई केली जाते, याबाबत जनसामान्य कमालिचे अनभिज्ञ आहेत.

विशेष म्हणजे संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमरावती शहर पोलिसांनी २२ मार्च २०२० ते २१ जुन २०२१ या सव्वा वर्षाच्या काळात कलम १८८ अन्वये तब्बल ४५१३ एफआयआर नोंदविले. यात मास्क नसणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, संचारबंदीच्या काळात वाहने चालविणे, अकारण फिरणाºयांविरूद्ध भादंविचे कलम १८८ व साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, ही कलम, दाखल केलेले गुन्हे लोकांना कोरोना काळात ‘कायदेभंग’ करण्यापासून थांबवू शकले नाहीत. पोलीस आयुक्तालय हद्दीत ४२८९ वाहने जप्त करण्यात आली. तर ४५१३ प्रकरणांमध्ये तब्बल ६५८१ व्यक्तींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. कायद्याचा वापर करण्याचा मूळ हेतूच साध्य होत नसून, गर्दी आवरताना आजही प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे.

------------------------

काय आहे भादंविचे कलम १८८

साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ यातील तरतुदीनुसार आपत्ती काळात काही नियम लागू होतात. शासनाने निर्देशित केलेले शासकीय अधिकारी या अनुषंगाने वेगवेगळे आदेश जारी करतात. या आदेशांची पायमल्ली करणाºया व्यक्तींवर भादंविच्या कलम १८८ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येतो.

--------

असे आहे शिक्षेचे स्वरूप

या कायद्यातील तरतुदीनुसार फक्त आदेशांचे उल्लंघन करणाºया व्यक्तीस एक महिन्याचा कारावास किंवा २०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात. दुसºया तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीने नियमाचे उल्लंघन केले आणि त्यातून मानवी जीवन वा आरोग्य धोक्यात सापडले तर, त्या व्यक्तीस सहा महिने कारावास किंवा एक हजार रुपये दंड वा दोन्ही शिक्षा मिळू शकतात.

--------------

लोक जुमानेनात

हा जामीनपात्र गुन्हा असून, शहरात मोठ्या संख्येने पोलिसांनी केलेल्या कारवाईचे आकडे समोर आले आहेत. येत आहेत. या गुन्ह्यांचे खटले काही महिन्यांनी कोर्टासमोर येतील. त्यातील काहींना दंड, शिक्षा मिळेल तर काही निर्दोष सुटतील. मात्र, तब्बल ९७ लाख रुपये मोजुनही कोरोना काळात लोकांनी जाणूनबुजून कायदेभंग केला, ही निश्चितच काळजीची बाब आहे.

----------------

दाखल प्रकरणे- ४५१३

वाहने डिटेन : ४२८९

आरोपी -६५८१

दंडवसुली: ९७ लाख

------------------

Web Title: Corona sentenced to death, but deliberately 'breaking the law'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.