कोरोना; सात मृत्यू, ४१४ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:12 AM2021-04-13T04:12:39+5:302021-04-13T04:12:39+5:30
अमरावती : जिल्ह्यात सोमवारी सात कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. याशिवाय ४१४ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५२,७९२ ...
अमरावती : जिल्ह्यात सोमवारी सात कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. याशिवाय ४१४ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५२,७९२ झालेली आहे.
कोरोना संक्रमितांचे सत्र जिल्ह्यात सुरूच आहे. संसर्ग कमी झाला असे आरोग्य विभाग सांगत असला तरी तीन दिवसांपासून चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटी वाढतीच आहे. सोमवारी २,३१५ नमुने चाचण्या करण्यात आल्या. यात ४१४ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. ही पॉझिटिव्हिटी १७.८८ टक्के आहे. यापूर्वी ७ ते ११ दरम्यान पॉझिटिव्हिटी होती. आता मात्र, तीन दिवसांपासून यात वाढ होत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.
उपचारानंतर बरे वाटल्याने सोमवारी ५९९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ४८,७७४ नागरिकांना संक्रमणमुक्त झालेले आहे. ही टक्केवारी ९२.३९ आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३,३००ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यात १,१६५ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्ण होम आयसोलेटेड आहेत. जिल्ह्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १३२ दिवसांवर पोहोचला आहे.
बॉक्स
२४ तासांत सात रुग्णांचा मृत्यू
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माहितीनुसार, लोणी येथील ४२ वर्षीय पुरुष, लिंगा, वरूड येथील ६८ वर्षीय महिला, नेरपिंगळाई येथील ६० वर्षीय महिला, जयरामनगर येथील ६८ वर्षीय, पांढुर्णा, मध्य प्रदेश येथील ६० वर्षीय महिला, देऊरवाडा, चांदूर बाजार येथील येथील ५५ वर्षीय महिला व कजबा खोलापूर येथील ७८ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.