विनाकारण फिरणाऱ्या १४९ नागरिकांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:13 AM2021-05-20T04:13:47+5:302021-05-20T04:13:47+5:30
अमरावती : झोन ३ मध्ये महापालिकेच्या पथकाने कारवाई करीत बुधवारी १०,५०० रुपयांचा दंड वसूल केला. याशिवाय विनाकारण फिरणाऱ्या १४९ ...
अमरावती : झोन ३ मध्ये महापालिकेच्या पथकाने कारवाई करीत बुधवारी १०,५०० रुपयांचा दंड वसूल केला. याशिवाय विनाकारण फिरणाऱ्या १४९ नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
सहायक आयुक्त नंदकिशोर तिखिले व उपअभियंता भास्कर तिरपुडे यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाय्या पथकाद्वारे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या १४९ नागरिकांची रेपिड टेस्ट करण्यात आली. त्यात एक व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांची कोरोना केअर सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली.
आले. एका नागरिकाच्या तोंडाला मास्क नसल्याने त्याच्याकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. एकूण १०,५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. यावेळी सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी देवरणकर, जेष्ठ स्वास्थ्य निरीक्षक कुंदन हडाले, स्वास्थ निरीक्षक व वसुली लिपिक तसेच झोन क्र.३ चे कर्मचारी उपस्थित होते.