बडनेरा झोनमध्ये ५०० जणांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:13 AM2021-04-28T04:13:47+5:302021-04-28T04:13:47+5:30
अकारण आले रस्त्यावर, महापालिकेच्या पथकाकडून तपासणी बडनेरा : दिवसेंदिवस कोरोनाचे संकट प्रचंड वाढते आहे. मात्र, मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर ...
अकारण आले रस्त्यावर, महापालिकेच्या पथकाकडून तपासणी
बडनेरा : दिवसेंदिवस कोरोनाचे संकट प्रचंड वाढते आहे. मात्र, मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहेत. अशा ५०० जणांची कोरोना चाचणी बडनेरा झोनमध्ये विविध ठिकाणी महापालिका पथकाद्वारे करण्यात आली.
बडनेरा मनपा झोन क्रमांक ४ अंतर्गत २० एप्रिलपासून सहा ठिकाणी पथकांद्वारे चाचणी करण्यात आली. नव्या वस्तीतील आठवडी बाजार, बारीपुरा, सावता चौक, साईनगर, गोपालनगर, नवाथे या मार्गांवर कोरोना चाचण्या करण्यात आल्या. ५०० लोकांची चाचणी करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त वैशाली मोटघरे यांनी दिली. पहिल्या तीन दिवसांत १७५ जणांची अँन्टिजेन चाचणी करण्यात आली. नंतर मात्र सर्वांची आरटी-पीसीआर चाचणी झाली. पथकात सहायक आयुक्त भाग्यश्री बोरेकर, स्वास्थ्य निरीक्षक एकनाथ कुलकर्णी, सतीश राठोड, अभियंता रवींद्र तांबेकर, सुमीत पाटील, राम सामुद्रे, राजू बग्गन, मंगेश गाले यांच्यासह इतरही कर्मचारी उपस्थित होते. चाचण्यांमधून किती कोरोना पॉझिटिव्ह पुढे आले, हे कळू शकले नाही. तथापि, ही मोहीम सुरूच राहणार आहे, असे मोटघरे म्हणाल्या.