बसस्थानक परिसरात कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:16 AM2021-06-16T04:16:06+5:302021-06-16T04:16:06+5:30

अमरावती : शहरात संचारबंदी असताना अकारण फिरणाऱ्या व बाहेरगावाहून आलेल्या १०४ नागरिकांची बसस्थानक परिसरात आरोग्य विभागाच्या टीमद्वारे कोरोना संदर्भात ...

Corona test in bus station area | बसस्थानक परिसरात कोरोना चाचणी

बसस्थानक परिसरात कोरोना चाचणी

Next

अमरावती : शहरात संचारबंदी असताना अकारण फिरणाऱ्या व बाहेरगावाहून आलेल्या १०४ नागरिकांची बसस्थानक परिसरात आरोग्य विभागाच्या टीमद्वारे कोरोना संदर्भात रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली.

-----------------------

रविवारी दिवसभर पावसाची उघाड

अमरावती : जिल्ह्यात शनिवारी रात्री दोन वेळा पाऊस आल्यानंतर रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाने विश्रांती घेतली. वातावरणात थंडावा आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

---------------------

दोन दिवस उघाड, पेरण्या थबकल्या

अमरावती : जिल्ह्यात मृगात सार्वत्रिक पाऊस झाल्यामुळे काही भागात कपाशीच्या पेरणीला सुरुवात झाली होती. मात्र, शनिवारपासून पावसाची उघाड असल्याने पेरण्या थबकल्या. बियाणे महाग असल्याने पुरेसा पाऊस असल्याशिवाय शेतकरी धजावत नाही.

--------------

चौकाचौकात वाहतुकीची कोंडी

अमरावती : शहरात दुपारी ४ पर्यंतच दुकाने उघडी राहत असल्याने सकाळची ११ चे दरम्यान बहुतांंश चौकात वाहतूक कोंडी होत आहे. काही चौकातील वाहतूक सिग्नल बंद असल्याने वाहतूक खोळंबण्याच्या प्रकारात वाढ झालेली आहे.

Web Title: Corona test in bus station area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.